नेहा पेंडसेने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना केले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 15:06 IST2021-01-11T15:01:10+5:302021-01-11T15:06:42+5:30

नेहा पेंडसेने काही फोटो शेअर केले असून यांत सोज्वळ अंदाज पाहायला मिळत आहे. तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल. शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून गेले आहे.

Nehha Pendse jaw-dropping white saree look | नेहा पेंडसेने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना केले घायाळ

नेहा पेंडसेने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना केले घायाळ

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे नेहा पेंडसेने  रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नेहा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. 

ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो. याआधीही नेहाने माळीचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.

नुकताच नेहाने काही फोटो शेअर केले असून यांत सोज्वळ अंदाज पाहायला मिळत आहे. तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल. शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून गेले आहे.

सोशल मीडियावर सध्या नेहाच्या या फोटोची चर्चा रंगली आहे.यातील एका फोटोत तिचा  स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.  तिच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिचे अनेक फोटो शेअर करत असते. 

नेहानं नुकताच तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. नेहानं ५ जानेवारी २०२० मध्ये पुण्यात मराठमोळ्या पद्धतीने शार्दुल सिंगशी लग्न केलं. नेहा आणि शार्दुलच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते.


गेल्या ५ वर्षांपासून सौम्या टंडन या मालिकेत काम करत होती. तिने अनिता भाभीची भूमिका लोकप्रिय केली होती. खाजगी कारणांमुळे काही दिवसांपूर्वीच सौम्याने ही मालिका सोडली होती. सौम्याने घेतलेल्या या निर्णयामुळे निर्मात्यांची झोप उडाली होती. त्यानंतर अनिता भाभीच्या भूमिकेसाठी अनेक नावांची चर्चा झाली. पण नेहाचे नाव कन्फर्म झाले. सौम्याने शो सोडल्यानंतर निर्मात्यांनी प्रथम या भूमिकेसाठी नेहा पेंडसे यांच्याकडे संपर्क साधला. ती त्याची पहिली पसंती होती. त्यावेळी बर्‍याच गोष्टी अडकल्या होत्या. यानंतर मेकर्सनी बर्‍याच अभिनेत्रींकडे संपर्क साधला पण ही बाब तिथेही होऊ शकली नाही. चार महिन्यांनंतर निर्मात्यांनी नेहाशी संपर्क साधला आणि करार केला. नेहाने या भूमिकेसाठी होकार दिला. लवकरच अनिता भाभीच्या भूमिकेत नेहा झळकणार आहे. 

Web Title: Nehha Pendse jaw-dropping white saree look