नेहा अन् परी होणार कायमच्या विभक्त; सिम्मीचा प्लॅन ठरेल का यशस्वी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 18:11 IST2022-05-23T18:10:49+5:302022-05-23T18:11:22+5:30
Mazi tuzi reshimgath: नेहाच्या गैरहजेरीत मिथीलाने परीची पूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे अगदी नेहाप्रमाणे मिथीला परीचा सांभाळ करत होती.

नेहा अन् परी होणार कायमच्या विभक्त; सिम्मीचा प्लॅन ठरेल का यशस्वी?
छोट्या पडद्यावर सध्या सुरु असलेल्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत अनेक रंजकदार वळणं येत असल्याचं पाहायला मिळत आहेत. नेहा-यशमधील प्रेम, चौधरी कुटुंबाला लागलेला परीचा लळा आणि त्यात सिम्मी करत असलेली कटकारस्थानं यामुळे ही मालिका दिवसेंदिवस रंजक होत आहे. यामध्येच आता सिम्मीने नवा डाव रचला आहे ज्यामुळे नेहा आणि परी कायमच्या विभक्त होणार आहेत.
नेहा ऑफिसच्या कामानिमित्त लंडनला गेल्यामुळे तिच्या गैरहजेरीत मिथीलाने परीची पूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे अगदी नेहाप्रमाणे मिथीला परीचा सांभाळ करत होती. अगदी तिच्या जेवणापासून ते झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीची ती काळजी घेत होती. हे पाहून नेहा आणि परीला वेगळं करण्याचा डाव सिम्मी रचते. यात परीला, मिथीला-विश्वजीतने दत्तक घ्यावं ही कल्पना ती आजोबांना सुचवते. ज्यामुळे आजोबा बंडू काकांकडे याविषयी चर्चा करतात. इतकंच नाही तर आता सिम्मी मुद्दाम नेहा-मिथीलामध्ये निर्माण होत असलेलं नवं नात नेहाला दाखवून तिला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करतीये.
सध्या सोशल मीडियावर नेहा, यश आणि सिम्मी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये परी आणि मिथीला यांच्यात निर्माण झालेली मैत्री सिम्मी मुद्दाम नेहाला दाखवते, ज्यामुळे नेहा अस्वस्थ व्हावी. परंतु, यावर नेहा उत्तर देणं टाळते. उलट परी व मिथीलामध्ये निर्माण होणारी मैत्री नेहाला आवडतांना दिसत आहे.