​ये प्यार नहीं तो क्या है या मालिकेमुळे नमित खन्ना आणि अंकित राज या जुन्या मित्रांची झाली पुन्हा भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 15:12 IST2018-03-15T09:42:56+5:302018-03-15T15:12:56+5:30

ये प्यार नहीं तो क्या है या आगामी मालिकेत प्रेक्षकांना एक आगळी वेगळी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. आजच्या पिढीच्या ...

Nayeem Khanna and Ankit Raj came again to meet the old friends because of this series of love | ​ये प्यार नहीं तो क्या है या मालिकेमुळे नमित खन्ना आणि अंकित राज या जुन्या मित्रांची झाली पुन्हा भेट

​ये प्यार नहीं तो क्या है या मालिकेमुळे नमित खन्ना आणि अंकित राज या जुन्या मित्रांची झाली पुन्हा भेट

प्यार नहीं तो क्या है या आगामी मालिकेत प्रेक्षकांना एक आगळी वेगळी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. आजच्या पिढीच्या नातेसंबंधांविषयी या मालिकेत भाष्य केले जाणार आहे. या मालिकेसाठी नमित खन्ना, पलक जैन आणि मनीष चौधरी या कलाकारांना मुख्य भूमिकेसाठी निवडण्यात आले आहे. त्याचबरोबर टेलिव्हीजन क्षेत्रातील इतर मोठी नावे देखील या मालिकेत मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत सिद्धान्त सिन्हा (नमित खन्ना) आणि अनुष्का रेड्डी (पलक जैन) यांची प्रेम कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  
नमित खन्ना हे मॉडेलिंगच्या जगातले प्रसिद्ध नाव आहे. त्याने सव्यसाची सारख्या मोठ्या ब्रँण्ड्ससाठी मॉडलिंग केले आहे. तसेच काही वेब सिरिजमधील त्याच्या भूमिकांना देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याच्या सोबत या मालिकेत अंकित राज देखील आहे. तो या मालिकेत कार्तिक रेड्डीची भूमिका साकारत आहे. तो या मालिकेत नायिकेचा भाऊ आहे. अंकित देखील मॉडेल आहे आणि त्याने देखील आजवर चांगले काम केलेले आहे. नमित आणि अंकित यांनी पूर्वी एकत्र रॅम्पवॉक केलेला आहे आणि आता चार वर्षांनंतर ते ये प्यार नहीं तो क्या है मालिकेच्या सेट्सवर पुन्हा एकत्र आले आहेत. दोघांना अनेक वर्षांनी एकत्र काम करण्याची संधी मिळाल्याने ते दोघे प्रचंड खूश आहेत. याविषयी अंकित सांगतो, “होय, आम्ही दोघांनी मॉडेल म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली आहे आणि आता आम्ही दोघेही अभिनेते झालो आहोत. नमितची आणि माझी ओळख खूप जुनी आहे. त्यावेळी आम्ही प्रसिद्ध ब्रँण्ड्ससाठी मॉडेलिंग करायचो. आमच्या दोघांची मैत्री अनेक वर्षांपासूनची आहे. आम्हाला दोघांनाही ही कल्पना नव्हती की, जवळ जवळ चार वर्षांनंतर नियती आम्हाला पुन्हा अशा रीतीने एकत्र आणेल. आपला मित्र देखील याच मालिकेत काम करतो आहे हे माहीत नसतानाच आम्ही दोघांनी या मालिकेत काम करण्याचे स्वीकारले. आम्हाला या मालिकेत काम करताना खूप मजा येत आहे.”

namit khanna

Web Title: Nayeem Khanna and Ankit Raj came again to meet the old friends because of this series of love