नवरी नटली...! 'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटूचा कमाल स्वॅग; व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 16:10 IST2021-12-18T16:09:54+5:302021-12-18T16:10:33+5:30

Yeu Kashi Tashi Mi Nandayla: अखेर ओम आणि स्वीटू लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

Navri Natali ...! 'Yeu Kashi Tashi Mi nandayala' fame Sweetu's superb Swag; The video is going viral | नवरी नटली...! 'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटूचा कमाल स्वॅग; व्हिडीओ होतोय व्हायरल

नवरी नटली...! 'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटूचा कमाल स्वॅग; व्हिडीओ होतोय व्हायरल

झी मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' ( Yeu Kashi Tashi Mi Nandayla)ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहचलेली पाहायला मिळते आहे. या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. या मालिकेत मालविका आणि मोहितचे कारस्थान सर्वांसमोर आले आणि त्यानंतर मोहित आणि स्वीटूचा घटस्फोटदेखील झाला आहे. ओम परदेशातून नुकताच परतला आणि आता स्वीटू व ओमची भेटदेखील झाली आहे. लवकरच स्वीटू आणि ओमचे लग्न पार पडणार आहे. दरम्यान स्वीटू(Anvita Phaltankar)ने वधूच्या गेटअपमध्ये रिल बनवताना दिसत आहे.

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत स्वीटूची भूमिका अभिनेत्री अन्विता फलटणकर हिने साकारली आहे. नुकताच तिचा वधूच्या गेटअपमधील दोन व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओत अन्विता नवरी नटली या गाण्यावर डान्स करताना दिसते आहे. या व्हिडीओत तिने लाल रंगाची साडी, केसात गजरा आणि गॉगल लावलेला पाहायला मिळतो आहे. 


तर दुसऱ्या व्हिडीओत स्वीटू उर्फ अन्विता फलटणकर वधूच्या गेटअपमध्ये ट्रेडिंग गाण्यावर रिल करताना दिसत आहे. तिच्या या दोन्ही व्हिडीओंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. हे दोन्ही व्हिडीओ झी मराठी वाहिनीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आले आहेत. उद्या म्हणजेच १९ डिसेंबरला रात्री ८वाजता विवाह विशेष भाग पाहायला मिळणार आहे. 


स्वीटूचे मोहितसोबत लग्न झाल्यानंतर प्रेक्षक खूप नाराज झाले होते. त्यांना स्वीटूचे लग्न ओमसोबत व्हायला पाहिजे, असे वाटत होते. अखेर तो क्षण जवळ आला आहे. आता ओम आणि स्वीटू लग्नबेडीत अडकणार आहेत आणि दोघे कायमचे एकत्र येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या लग्नाचा विशेष भाग पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

Web Title: Navri Natali ...! 'Yeu Kashi Tashi Mi nandayala' fame Sweetu's superb Swag; The video is going viral