महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचा सर्वात छोटा फॅन पाहिलात का, आहे या अभिनेत्रीचा मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 16:29 IST2021-04-14T16:24:18+5:302021-04-14T16:29:30+5:30

अनेक मराठी कलाकार त्यांच्या मुलांसोबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.

Namrata sambherao share cute video with her son | महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचा सर्वात छोटा फॅन पाहिलात का, आहे या अभिनेत्रीचा मुलगा

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचा सर्वात छोटा फॅन पाहिलात का, आहे या अभिनेत्रीचा मुलगा

अनेक मराठी कलाकार त्यांच्या मुलांसोबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.. आपल्या मुलांसोबत मजामस्ती करतानाचे गोड क्षण ते फॅन्ससोबत शेअर करत असतात.  सेलिब्रिटी किड्सचे व्हिडिओज तर सोशल मीडियावर लगेचच व्हायरल होतोना दिसतात. अभिनेत्री नम्रता संभेरावाचा तिच्या मुलांसोबतचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओत नम्रताचा  मुलगा ऋद्राज आईचा शो महाराष्ट्राची हास्य जत्राचं नाव  आपल्या बोबड्यात शब्दात बोलताना दिसतोय. ऋद्राजच्या क्यूट अंदाजावर सगळेच फिदा झाले आहेत. नम्रता आणि ऋद्राज या व्हिडिओला अनेक मराठी सेलिब्रिटींनी कमेंट केले आहेत. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचा सगळ्यात छोटा पण मोठा फॅन, ह्या दिवसाची मी आतुरतेने वाट पहात होते, असे कॅप्शन नम्रताने हा व्हिडीओ शेअर करताना दिलं आहे. 

 
महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या अंतिम फेरीत धडक मारत नम्रताने स्वतःमधील अभिनय कौशल्य सिद्ध केले. 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या. 'बाबू बँड बाजा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. विशेष म्हणजे प्रियंका चोप्राची निर्मिती असलेल्या 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिकासुद्धा खूप गाजली. नम्रताने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलं आहे. 


 

Web Title: Namrata sambherao share cute video with her son