शूटिंगदरम्यान या अभिनेत्याला लागला विजेचा शॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 19:00 IST2019-11-26T18:59:31+5:302019-11-26T19:00:22+5:30

छोट्या पडद्यावरील या अभिनेत्याला शूटिंगदरम्यान विजेचा झटका लागला. लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले

Namish Taneja Suffers Electric Shock While Shooting For Vidya | शूटिंगदरम्यान या अभिनेत्याला लागला विजेचा शॉक

शूटिंगदरम्यान या अभिनेत्याला लागला विजेचा शॉक

विद्या व स्वरागिनी मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता नमिश तनेजा याला शूटिंगदरम्यान विजेचा झटका लागला आहे. त्यानंतर लगेचच त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या नमिशकडून याप्रकरणी कोणतेही स्टेटमेंट आलेलं नाही. मात्र हे वृत्त वाचून त्याच्या चाहत्यांना त्याची काळजी वाटत आहे.

नमिश तनेजा सध्या ‘विद्या’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत नमिशला रुग्णालयात काम करत असताना विजेचा झटका लागतो. या दृष्याचे चित्रीकरण सुरु होते. दिग्दर्शकाने दिलेल्या सुचनेप्रमाणे अभिनय करत असताना त्याने विजेच्या बटणाला हात लावला. त्यावेळी त्याला खरोखरचा झटका लागला.

सुरुवातीला हे दृष्य पाहून नमिश अभिनय करत असल्याचे सर्वांना वाटले. परंतु त्यानंतर त्याला बेशुद्ध झाल्याचे पाहून खरी घटना सर्वांच्या लक्षात आली. त्यानंतर त्याला लगेचच जवळच्या रुग्णालयात भरती केले गेले. आता त्याची प्रकृती स्थिर असून लवकरच तो या मालिकेत अभिनय करताना चाहत्यांना दिसेल. 


नमिशने २०१४ साली टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. आतापर्यंत तो मैं मायके चली जाऊंगी, स्वारागिनी, एक नई पहचान, प्यार तूने क्या किया, इक्यावन यासारख्या मालिकेत झळकला आहे.

Web Title: Namish Taneja Suffers Electric Shock While Shooting For Vidya