'नच बलिए- 9' शोमध्ये पुन्हा एकदा हे कपल दिसतील एकत्र, मीरा राजपुत OUT करिनाची होणार ENTRY

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 12:24 IST2019-04-03T12:20:36+5:302019-04-03T12:24:24+5:30

शाहिद पहिल्यांदाच पत्नी मीरासह ऑनस्क्रीन झळकणार होता. त्यामुळे त्याच्यासाठी ही संधी खूप खास होती.

'Nach Baliye - 9' Once again Shahid And Kareena will be seen together, Mira Rajput will be out of the Show | 'नच बलिए- 9' शोमध्ये पुन्हा एकदा हे कपल दिसतील एकत्र, मीरा राजपुत OUT करिनाची होणार ENTRY

'नच बलिए- 9' शोमध्ये पुन्हा एकदा हे कपल दिसतील एकत्र, मीरा राजपुत OUT करिनाची होणार ENTRY

 'नच बलिए सीजन 9' लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या शोची लवकरात लवकर रसिकांच्या मनावर छाप पाडावी यासाठी शोची टीम एक से बढकर एक आयडीया लढवत आहेत. शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धकांपासून ते या शोच्या जजच्या खूर्चीवर कोण बसणार अशा सगळ्या गोष्टींवर टीम मेहनत घेत आहे. गेल्या आठवड्यात शोला शाहिद कपूरसह पत्नी मीरा राजपुतही जज करणार असल्याचे चर्चा होती. दोघांनीही ही ऑफर स्विकारली होती.

 

कारण शाहिद पहिल्यांदाच पत्नी मीरासह ऑनस्क्रीन झळकणार होता. त्यामुळे त्याच्यासाठी ही संधी खूप खास होती. आता त्यातच मोठा ट्विस्ट आणण्याच्या तयारीत शोची टीम आहे. आता करिना कपूरही या शोमध्ये जज असणार असल्याचे बोलले जात आहे. याविषयी अजून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा नसली तरी  एके काळचे लव्हबर्ड शाहिद-करीना  यांच्या प्रेमाची लोकप्रियता कॅश करण्याचा निर्माते नक्की प्रयत्न करतील असं दिसतंय. 


या शोला जेनिफर विंगेट आणि सुनील ग्रोवर होस्‍ट करणार आहेत.या सिझनमध्ये देखील अनेक प्रसिद्ध जोड्या सहभागी होणार आहेत. प्रेक्षकांच्या आवडत्या जोड्या आठवड्यांमागून आठवडे वेगवेगळे प्रकारची नृत्ये सादर करताना पाहून प्रेक्षकांचे भान हरपणार यात काहीच शंका नाही. तसेच बॉलिवूडचा आजचा आघाडीचा अभिनेता टायगर श्रॉफचेही नाव जजसाठी समोर येत होते. टायगर विशेष परीक्षक या नात्याने सहभागी होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमात विशेष परीक्षकाची भूमिका स्वीकारण्याबद्दल त्याच्याकडे विचारणा करण्यात आली असून तोसुद्धा यावर सकारात्मक विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 

Web Title: 'Nach Baliye - 9' Once again Shahid And Kareena will be seen together, Mira Rajput will be out of the Show