या प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्याला पोस्को अंतर्गत बलात्काराच्या प्रकरणात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 10:26 IST2021-06-05T10:26:29+5:302021-06-05T10:26:52+5:30

या अभिनेत्याने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

Naagin 3 actor Pearl V Puri arrested for alleged rape | या प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्याला पोस्को अंतर्गत बलात्काराच्या प्रकरणात अटक

या प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्याला पोस्को अंतर्गत बलात्काराच्या प्रकरणात अटक

ठळक मुद्देपर्ल व्ही पुरीने बेपनाह प्यार, ब्रह्मराक्षस 2, नागिन 3, 'नागार्जुन एक योद्धा' यांसारख्या अनेक सुपरहिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

छोट्या पडद्यावरील अभिनेता करण मेहराला काही दिवसांपूर्वी कौंटुबिक वादातून अटक करण्यात आली होती आणि आता त्याच्यानंतर नागिन या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या एका अभिनेत्याला बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

नागिन या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या पर्ल व्ही पुरीला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार पर्ल विरोधात एका मुलीच्या कुटुंबियांनी बलात्कार केल्याचा आरोप लावला आहे. 4 जून रोजी या मुलीच्या कुटुंबीयांनी पर्ल विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर काही तासांतच त्याला अटक करण्यात आली आहे. ही मुलगी अल्पवयीन असून पर्लच्या विरोधात पोस्को (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्युअल ऑफेन्सेस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 

पर्ल व्ही पुरीने बेपनाह प्यार, ब्रह्मराक्षस 2, नागिन 3, 'नागार्जुन एक योद्धा' यांसारख्या अनेक सुपरहिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. गेल्या काही काळात तो नागिन या मालिकेमुळं प्रचंड चर्चेत होता. सोशल मीडियावर पर्लला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. 

Web Title: Naagin 3 actor Pearl V Puri arrested for alleged rape