जावई माझा भला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 10:47 IST2016-10-07T11:46:17+5:302016-10-17T10:47:16+5:30
ये है मोहोब्बते या मालिकेत अभय भार्गव प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेत रमणची भूमिका साकारणाऱ्या करण पटेलने अभय यांच्या ...
.jpg)
जावई माझा भला
य है मोहोब्बते या मालिकेत अभय भार्गव प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेत रमणची भूमिका साकारणाऱ्या करण पटेलने अभय यांच्या मुलीशी खऱ्या आयुष्यात लग्न केलेले आहे. त्यामुळे जावई आणि सासरे या मालिकेत आपल्याला एकत्र पाहायला मिळतात. आता या मालिकेत अभय यांची पत्नी किरण भार्गव यांची एंट्री होणार आहे. किरण यांनी याआधी मेरी सासू माँ या मालिकेत काम केले आहे. आलियाच्या आजीच्या भूमिकेत किरण आपल्याला पाहायला मिळणार आहे . या मालिकेतील किरण यांची भूमिका ही काहीच दिवसांची असली तरी आपल्या पती आणि जावयासोबत काम करण्यास त्या खूपच उत्सुक आहेत. त्यांनी मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली असून त्यांची लवकरच मालिकेत एंट्री होणार आहे. करणसोबत आता आता त्याचे सासू-सासरे दोघेही काम करणार असल्याने तो चांगलाच खूश आहे.