मेरी आशिकी तुम से ही फेम स्मृती खन्ना आणि गौतम गुप्ता यांनी केला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2017 11:46 IST2017-04-17T06:16:30+5:302017-04-17T11:46:30+5:30

मेरी आशिकी तुम से ही या मालिकेतील रिल कपल आता रिअल लाइफमध्येही कपल बनले आहेत. ही मालिका 2016च्या सुमारास ...

My Aashiqui Tame Fame Smruti Khanna and Gautam Gupta did the same | मेरी आशिकी तुम से ही फेम स्मृती खन्ना आणि गौतम गुप्ता यांनी केला साखरपुडा

मेरी आशिकी तुम से ही फेम स्मृती खन्ना आणि गौतम गुप्ता यांनी केला साखरपुडा

री आशिकी तुम से ही या मालिकेतील रिल कपल आता रिअल लाइफमध्येही कपल बनले आहेत. ही मालिका 2016च्या सुमारास संपली. या मालिकेत स्मृती खन्ना रितिका रणवीर वाघेला तर गौतम गुप्ता शर्मन मितेश पारेख ही भूमिका साकारत होते. या दोघांची ओळख या मालिकेच्या सेटवरच झाली आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. ही मालिका संपली तोपर्यंत या दोघांनी लग्न करण्याचा निर्णयदेखील घेतला होता. नुकताच गौतमचा वाढदिवस झाला. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते दोघे गोव्याला गेले होते. त्यावेळी गौतमने तिला खूप छान सरप्राइझ दिले. स्मृतीने याबाबतची बातमी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना दिली आहे. त्या दोघांचा एक फोटो पोस्ट करून आजपासून शेवटच्या क्षणापर्यंत तू माझा आणि मी तुझी बनली आहे असे तिने म्हटले आहे. याविषयी स्मृती सांगते, "मेरी आशिकी तुम से ही ही मालिका संपल्यानंतर आमच्या दोघांची मेत्री अधिक घट्ट झाली आणि आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. गोव्याला गौतमचा वाढदिवस साजरा करत असताना त्याने गुडघ्यांवर बसून मला प्रपोज केले. मी माझा हा आनंद शब्दांत व्यक्त करू शकत नाही. यामुळे आमच्या घरातलेदेखील खूप खूश झाले आहेत. मालिकेत आम्ही कपल दाखवले होतो आणि आता खऱ्या आयुष्यातही आम्ही कपल बनले आहोत. लग्न करण्याचे आमच्या डोक्यात कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. पण लग्नाच्या तारखेबाबत आम्ही काहीही विचार केलेला नाही. आमचे पालक आमच्या लग्नाची तारीख लवकरच ठरवतील." 
स्मृतीने बालिकावधू, कसम तेरे प्यार की, कुछ तो है तेरे मेरे दरमियाँ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. 

Web Title: My Aashiqui Tame Fame Smruti Khanna and Gautam Gupta did the same