जीजाजी छत पर है मालिकेत या कारणामुळे मुरारी घेणार करुणावर संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 14:53 IST2018-09-07T14:52:02+5:302018-09-07T14:53:15+5:30

जीजाजी छत पर है या मालिकेच्या आगामी भागामध्ये मुरारी (अनुप उपाध्याय) करुणावर (सोमा राठोड) आरोप करणार आहे. करुणाला आणखी एक मूल आहे असा मुरारीला संशय येणार आहे.

Murari will take doubt on Karuna in Jijaji Chhat Per Hain | जीजाजी छत पर है मालिकेत या कारणामुळे मुरारी घेणार करुणावर संशय

जीजाजी छत पर है मालिकेत या कारणामुळे मुरारी घेणार करुणावर संशय

सोनी सबवरील जीजाजी छत पर है या मालिकेने प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळवले आहे. यातील विनोदी पटकथेने देशभरातील प्रेक्षकांना आकर्षून घेतले आहे. या मालिकेतील ईलायची, पंचम, मुरारी या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या   आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना एक मजेदार गोष्ट पाहायला मिळणार आहे. 

जीजाजी छत पर है या मालिकेच्या आगामी भागामध्ये मुरारी (अनुप उपाध्याय) करुणावर (सोमा राठोड) आरोप करणार आहे. करुणाला आणखी एक मूल आहे असा मुरारीला संशय येणार आहे. घरातील सर्वच सदस्यांना म्हणजे मुरारी, पंचम (निखिल खुराना) आणि ईलायची (हिबा नवाब) या सगळ्यांनाच करुणाचं वागणं काहीसं संशयास्पद वाटणार आहे. ती कुठे जाते, कोणाला भेटते याविषयी सगळ्यांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. पंचमला कळतं की, करुणा एका लहान मुलीला भेटण्यासाठी घरी खोटं बोलून जाते आणि ती मुलगी करुणाला अम्मा अशी हाक देखील मारते. त्यामुळे पंचमने पकडल्यावर ती त्याला दुकानातून पैसे चोरायला सांगणार आहे. मात्र, ईलायची आणि मुरारी आपल्याला पाहत आहेत, हे तिला माहीतच नाहीये. मुरारी यामुळे फारच दुखावला असून आपल्या बायकोने आपल्याला फसवलं असं त्याला वाटत आहे. मात्र, करुणा असं काही करेल यावर ईलायचीचा विश्वास बसत नाहीये. करुणा खरंच मुरारीला फसवते आहे का? तिला खरंच आणखी एक मूल आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये मिळणार आहेत. मालिकेला येणाऱ्या या रंजक वळणाविषयी करुणाची भूमिका साकारणाऱ्या सोमा राठोड सांगतात, "सोनी सबवरील जीजाजी छत पर है या मालिकेमधील माझा करुणा म्हणून झालेला प्रवास सुरुवातीपासूनच उत्कंठापूर्ण आहे. या भूमिकेला विनोदाची झालर देणं सोपं नव्हतं. पण ही मालिका, माझी भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. आम्ही यापुढेही प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहू आणि येत्या भागांमध्ये तर उत्कंठा फारच वाढणार आहे हे मी नक्कीच सांगेन."

Web Title: Murari will take doubt on Karuna in Jijaji Chhat Per Hain