मुकुल देव यांचे ११ वर्षांनंतर टीव्हीवर पुनरागमन !!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 04:28 AM2018-01-05T04:28:33+5:302018-01-05T10:12:50+5:30

मुकुल देव छोट्या पडद्यावर पुनरागमन करतायते. 'मेरे पापा हीरो हिरालाल' या मालिकेत खलनायक आदिवासी अफगाण नेता गुल बादशाहची भूमिका ...

Mukul Dev's return to TV after 11 years !! | मुकुल देव यांचे ११ वर्षांनंतर टीव्हीवर पुनरागमन !!

मुकुल देव यांचे ११ वर्षांनंतर टीव्हीवर पुनरागमन !!

googlenewsNext

lass="m_-3159954270237343627m_7488378690305895031m_-7122112778760382124m_-6706097305868907933gmail-MsoNormal" style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; text-align: justify;">मुकुल देव छोट्या पडद्यावर पुनरागमन करतायते. 'मेरे पापा हीरो हिरालाल' या मालिकेत खलनायक आदिवासी अफगाण नेता गुल बादशाहची भूमिका साकारेल, जो पश्तुन डोंगररांगांमधील असून भारतीय सैनिकांशी लढत आहे. ह्या शोमध्येमोहित रैना नायक हविलदार ईशर सिंग आणि ल्यूक केनी मेजर डेज वोक्स यांच्या रूपात दिसून येतील. अभिमन्यू सिंग यांच्या काँटिलो पिक्चर्स प्रा.लि.ची निर्मिती असलेली २१ सरफरोशःसारागाऱ्ही १८९७ ही मालिका सप्टेंबर १८९७ मध्ये नॉथवेस्ट फ्रंटिअर प्रॉव्हिंसमध्ये सारागाऱ्ही येथील आर्मी आऊटपोस्टची १०००० हून अधिक पश्तुन आणि ओराकझाई आदिवासींच्याहल्ल्याविरोधात सुरक्षा करताना ब्रिटिश इंडियन आर्मीच्या ३६ व्या सीख रेजिमेंटमधील २१ धैर्यशाली सैनिकांच्या वास्तविक आयुष्यावरून प्रेरणा घेऊन बनवण्यात आली आहे. डिस्कव्हरी जीत वाहिनीवर २१ सरफरोशः सारागाऱ्ही १८९७ हि मालिका लवकरच सुरू होत आहे.

आपल्या बोलण्याची तऱ्हा आणि योग्य उच्चार प्राप्त करण्यासाठी मुकुल आपले वडिल आणि दोस्तांकडून भाषेचे धडे घेत आहेत. एवढेच नाही तर आपल्या ह्या अगदी नवीन अवतारामध्येसर्वांना प्रभावित करण्याचा दृढनिश्चय त्यांनी केला असून यात ते लांबच लांब कफ्तान, सलवार, आदिवासी पगडी आणि डोळ्‌यांमध्ये सुरमा घातलेले दिसून येतील. आपल्या भूमिकेबद्दल मुकुलम्हणाले, “सध्या टीव्हीवर सुरू असलेल्या मालिकांपेक्षा खूप वेगळा, नाट्‌यमय आणि गुंगवून टाकेल असा प्रोजेक्ट मला हवा होता. जेव्हा डिस्कव्हरी जीतकडून मला ह्या भूमिकेसाठीविचारण्यात आले, तेव्हा मला खात्री होती की ही वेगळी भूमिका आहे. सारागाऱ्हीचे युद्ध आपल्या इतिहासातील एक महत्त्वाचे पान असून त्याचा हिस्सा बनण्यासाठी मी लगेचच तयारझालो.”ही हिंदी मालिका आहे त्यामुळे मला माझा असा खास स्पर्शही ह्या भूमिकेला देता येईल.” असेही मुकुल पुढे म्हणाले.  

Web Title: Mukul Dev's return to TV after 11 years !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.