‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतील सुमी आठवते? आत्ता ओळखणंही झालं कठीण 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 08:00 AM2022-03-28T08:00:00+5:302022-03-28T08:00:02+5:30

Mrs Mukhyamantri : आत्ता या सुमीला पाहाल तर तिला ओळखणं कठीण होईल. सुमी अर्थात अमृताने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

mrs mukhyamantri fame actress Amruta Dhongade share photos on instagram | ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतील सुमी आठवते? आत्ता ओळखणंही झालं कठीण 

‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतील सुमी आठवते? आत्ता ओळखणंही झालं कठीण 

googlenewsNext

मिसेस मुख्यमंत्री’ (Mrs Mukhyamantri) या मालिकेतील सुमी आठवत असेलच. होय, आम्ही बोलतोय ते या मालिकेत सुमीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता धोंगडे (Amruta Dhongade) हिच्याबद्दल. आत्ता या सुमीला पाहाल तर तिला ओळखणं कठीण होईल. सुमी अर्थात अमृताने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

या फोटोंमध्ये अमृता धोंगडे फारच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसून येत आहे. अमृताने ब्रालेट ड्रेसमध्ये सर्वांनाच घायाळ केलं आहे.  फोटोग्राफर अक्षय परांजपेने सुद्धा आपल्या पेजवर अमृताचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.  


 
मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या अमृताला ‘मिसेस मुख्यमंत्री’  या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्याआधी अमृताने ‘मिथुन’ या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती.  

अमृताचं पूर्ण नाव अमृता माणिकराव धोंगडे आहे. खरं तर अमृताच्या  अभिनय क्षेत्रात येण्यास वडिलांचाविरोध होता. पण तिच्या आईने पाठिंबा दिला. आईच्या पाठिंब्यामुळे आज ती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून नावारुपास आली आहे. 
अमृता अभिनय क्षेत्रात तशी योगायोगानेच आली. अमृताने अभिनय क्षेत्रात येण्याचं ठरलं नव्हतं. अमृताची डॉक्टर होण्याची इच्छा होती. अभिनेत्री नसतो तर आपण डॉक्टर झालो असतो असं ती आजही सांगते.  

मित्रांनी सांगितल्यानं तिनं ऑडिशन दिलं आणि तिची चित्रपटासाठी निवड झाली. पुढे ‘मिसेस मुख्यमंत्री’ ही मालिका तिला मिळाली. या मालिकेत अमृता नॉन ग्लॅमरस भूमिकेत होती. पण खऱ्या आयुष्यात ती चांगलीच ग्लॅमरस आहे. 
आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती नेहमी आपले फोटो शेअर करत असते.या फोटोंमधून तिचा ग्लॅमरस आणि बिनधास्त अंदाज पहायला मिळतो.

Web Title: mrs mukhyamantri fame actress Amruta Dhongade share photos on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.