'अक्षरा उर्फ मास्तरीन बाई..', सूनाबाईंच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी लिहिली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 03:48 PM2023-10-28T15:48:59+5:302023-10-28T15:52:46+5:30

शिवानीच्या वाढदिवसानिमित्त सासूबाईंनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तिचे कौतुक केलं आहे.

Mrinal kulkarni writes a special post for tula shikvin changlach dhada fame actress shivani rangole | 'अक्षरा उर्फ मास्तरीन बाई..', सूनाबाईंच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी लिहिली खास पोस्ट

'अक्षरा उर्फ मास्तरीन बाई..', सूनाबाईंच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी लिहिली खास पोस्ट

मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णीने गेल्या वर्षी अभिनेत्री शिवानी रांगोळेशी लग्नगाठ बांधली. अशा प्रकारे मृणाल कुलकर्णी खऱ्या आयुष्यात सासूच्या भूमिकेत गेल्या. सून शिवानीचं त्या नेहमीच कौतुक करताना दिसतात. आज शिवानी आपला वाढदिवस साजरा करते आहे. लाडक्या सूनेच्या वाढदिवसानिमित्त सासूबाईंनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तिचे कौतुक केलं आहे. 

 मृणाल आणि सून शिवानी यांचा बॉंड सासू सूनेपेक्षा मैत्रिणीसारखा जास्त आहे. तसंच ती मृणाल यांना 'ताई' असं म्हणते. अनेक कार्यक्रमांना त्या दोघी एकत्र हजेरी लावताना दिसतात. 

मृणाल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर शिवानीचा फोटो शेअर करत लिहिले, ''सूनबाई, कम सून !! प्रिय शिवानी, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ! गेले २-३ महिने अविरत कष्ट करते आहेस .. तेही हसतमुखाने… न दमता-न कंटाळता ! “तुला शिकविन चांगलाच धडा” मालिकेतली अक्षरा उर्फ मास्तरीन बाई म्हणून अमाप लोकप्रिय झाली आहेस. आम्हाला तुझ्या यशाचा खूप आनंद आहे. अभिमान आहे ! अशीच यशस्वी हो.. तुझी सारी स्वप्नं पूर्ण होऊ देत ! आनंदी रहा ! खूप खूप प्रेम ! (ता. क.- पण सून, come soon g ! Miss you! तुझे लाड कधी करायचे आम्ही?)

सध्या शिवानी झी मराठीवरील तुला शिकविन चांगलाच धडा मालिकेत अक्षरा उर्फ मास्तरीन बाईंची भूमिका साकारते आहे. अक्षरा ही भूमिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तसेच अक्षरा आणि अधिपतीची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. 
 

Web Title: Mrinal kulkarni writes a special post for tula shikvin changlach dhada fame actress shivani rangole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.