कपड्यांपेक्षा जास्त दागिन्यांचीच आवड -टीना दत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 15:58 IST2017-02-27T10:28:11+5:302017-02-27T15:58:11+5:30

छोट्या पडद्यावरील उतरन फेम टीना दत्ताला रसिकांनी तिच्या भूमिकेमुळे खूप पसंत केले. मालिकेत तपस्या आणि इच्छा या दोघांची मैत्रीही ...

More jewelery than clothes, Tina Dutta | कपड्यांपेक्षा जास्त दागिन्यांचीच आवड -टीना दत्ता

कपड्यांपेक्षा जास्त दागिन्यांचीच आवड -टीना दत्ता

ट्या पडद्यावरील उतरन फेम टीना दत्ताला रसिकांनी तिच्या भूमिकेमुळे खूप पसंत केले. मालिकेत तपस्या आणि इच्छा या दोघांची मैत्रीही रसिकांनी पाहिली. मालिकेत अगदी साधी सोज्वळ मालिकेतली इच्छा आता ग्लॅमडॉल बनली आहे. होय, वेगवेगळ्या पोजमध्ये हटके ड्रेसिंगमध्ये ती तिचे फोटोशूट करून घेत असते.



सोशल मीडियावर तिचे गॉजिअस फोटोडनचा तिचे चाहतेही पसंती देताना दिसतायेत. कधी शॉर्टस तर कधी ट्रेडिशनल लुकमध्ये दिसणारी ही इच्छा म्हणजेच टीनाला एका गोष्टीचीं खूप आवड आहे.ती म्हणजे तिला वेगवगेळ्या प्रकराचे दागिने घालायला आवडतात. म्हणून जेव्हा जेव्हा ती पारंपारिक ड्रेस परिधान करते तेव्हा ती हटके आणि स्टाइलिश लुक देणारे दागिनेला पहिली पसंती देत असल्याचे टीना सांगते, कधी नेकलेस तर कधी अँकलेटस , कधी हटके हॅगिंग इअर रिंग्स तर ट्रेडी रिंग्सती घातलाना दिसते. 




तिच्याकडे कपड्यांपेक्षा दागिन्यांचे खूप कलेक्शन असल्याचे सांगते. जिथे जिथे ती फिरायला जाते तिथे ती ज्वेलरी विकत घेत असते. त्यामुळे कपड्यांपेक्षा टीनाला ज्वेलरीचेच जास्त वेड असल्याचे तिने म्हटले आहे.मालिकेतही टीना पारंपारिक अंदाजात दिसली होती. मात्र आता तिला तिने तिची इमेज बदलली असून ग्लॅमसर अंदाजात तिचे फोटो इन्स्टाग्राम या सोशल साइटवर अपलोड करत असते. तिचे गॉर्जिअस फोटो पाहुन टीना पुन्हा कधी छोट्या पडद्यावर झळकणार असाही प्रश्न रसिकांना पडला आहे.यापूर्वी उतरन, कोई आने को है,कॉमेडी सर्कस,कॉमेडी नाईटस विथ कपिल,झलक दिखला जा सिझन 7,कॉमेडी नाईटस बचाव या शोमध्ये ती झळकली होती.

Web Title: More jewelery than clothes, Tina Dutta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.