मोहित रैना आणि मुकुल देवने भारतीय सैनिकांसोबत मारल्या गप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 10:24 AM2018-01-24T10:24:53+5:302018-01-24T16:25:45+5:30

डिस्कव्हरी जीत वाहिनीवर २१ सरफरोशः सारागाऱ्ही १८९७ ही मालिका लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेमध्ये हवालदार ईशर सिंगची ...

Mohit Raina and Mukul Dev chanted them with Indian soldiers | मोहित रैना आणि मुकुल देवने भारतीय सैनिकांसोबत मारल्या गप्पा

मोहित रैना आणि मुकुल देवने भारतीय सैनिकांसोबत मारल्या गप्पा

googlenewsNext
स्कव्हरी जीत वाहिनीवर २१ सरफरोशः सारागाऱ्ही १८९७ ही मालिका लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेमध्ये हवालदार ईशर सिंगची भूमिका मोहित रैना तर गुल बादशाहची भूमिका अभिनेता मुकुल देव साकारत आहे. २१ सरफरोशः सारागाऱ्ही १८९७ ही मालिका ब्रिटिश इंडियन आर्मीच्या ३६ व्या सीख रेजिमेंटमधील २१ धैर्यशाली सैनिकांच्या वास्तविक आयुष्यावरून प्रेरणा घेऊन बनवण्यात आली आहे. ही मालिका १२ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. लवकरच प्रजासत्ताक दिन येणार असून या दिनाच्या निमित्ताने नुकतीच बीएसएफ सैनिकांची या मालिकेच्या टीमने भेट घेतली. त्यांच्यासोबत मालिकेच्या टीमने खूप चांगला वेळ घालवला. तसेच त्यांच्यासोबत देशभक्तीपर गाणी गायली. याविषयी मोहित रैना सांगतो, “आपले सैनिक सगळ्‌या अडथळ्‌यांना आणि प्रत्येक आव्हानाला पार करतात आणि केवळ म्हणूनच आपण आपल्या आयुष्याचा खरा आनंद घेऊ शकतो. मी त्यांच्या चैतन्याला सलाम करतो. मी हवालदार ईशर सिंगची भूमिका साकारत असल्याने मला पूर्वीपेक्षा भारतीय सैनिकांचे आयुष्य आपलेसे वाटू लागले आहे. या जवानांना भेटून त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा अनुभव कसा होता हे शब्दांमध्ये व्यक्त करणे कठीण आहे. प्रत्येकाने याचा अनुभव घ्यायला हवा.” याविषयी मुकुल देव सांगतो, “भारत-पाकिस्तान सीमेवर प्रजासत्ताक दिनाच्या आधी जेसीपी अट्टारी येथे जाण्याचा अनुभव खूपच छान होता. जेसीपी अट्टारी येथील सोहळा अतिशय रोमहर्षक होता. तिथले वातावरणच खूप वेगळे होते. तिथे सैनिकांसोबत गप्पा मारणे आणि त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याचा अनुभव खूपच छान होता.”
१२ फेब्रुवारी २०१८ रोजी सुरू होत असलेली डिस्कव्हरी जीत ही वाहिनी मनोरंजन वाहिन्यांच्या अंतराळात अभिनवता आणण्यासाठी सज्ज आहे. ‘है मुमकिन’ या तत्त्वावर आधारलेली ही वाहिनी डिस्कव्हरीचे अतुलनीय कथाकथन आणि रिअल-लाईफ मनोरंजनातील सर्वोत्तम लाखोंना प्रेरणा देण्याचे उद्दिष्ट्‌य असलेल्या भव्यदिव्य जीवन कथांमधून एकत्र आणेल. डिस्कव्हरी जीत ही वाहिनी भारतातील मनोरंजन वाहिन्यांच्या उद्योगातील इतिहासात १० करोडहून अधिक घरांमधील आजतागायतच्या सर्वाधिक मोठ्‌या वितरणासह सुरू करण्यात येणार आहे. 

Also Read : ​२१ सरफरोशः सारागाऱ्ही १८९७ च्या टीमने सैनिकांसोबत साजरा केला आर्मी दिन

Web Title: Mohit Raina and Mukul Dev chanted them with Indian soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.