मोहित मलिकला वाटते ह्या शब्दाची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 07:15 IST2018-12-23T07:15:00+5:302018-12-23T07:15:00+5:30

स्टार प्लस वाहिनीवरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत रॉकस्टार सिकंदरसिंग गिलची भूमिका मोहित मलिक साकारणार आहे.

Mohit Malik feels the fear of the word | मोहित मलिकला वाटते ह्या शब्दाची भीती

मोहित मलिकला वाटते ह्या शब्दाची भीती

ठळक मुद्देमोहित मलिक सिकंदरच्या भूमिकेतमोहित मलिकला वाटते घटस्फोट शब्दाची भीती


स्टार प्लस वाहिनीवरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत रॉकस्टार सिकंदरसिंग गिलची भूमिका पार पाडणारा कलाकार मोहित मलिक विवाहित असून तो आपल्या वैवाहिक जीवनात खूप सुखी आहे. मालिकेत मात्र त्याची व्यक्तिरेखा आपली पत्नी लव्हलीबरोबर (अंजली आनंद) घटस्फोट घेण्याच्या तयारीत असते.

घटस्फोटाबद्दल मोहितने सांगितले की, वास्तव जीवनात घटस्फोटाच्या दिव्यातून जाण्याचा प्रसंग कोणावरही ओढवू नये. त्याचे लग्न होऊन आता आठ वर्षे होत आली असली, तरी घटस्फोट या शब्दाची त्याला भयंकर भीती वाटते. घटस्फोट घेताना माणसाला कोणत्या दिव्यातून जावे लागते, याची मला आता कल्पना आली आहे. घटस्फोट घेणाऱ्या
दाम्पत्यापेक्षाही त्यांची मुलं आणि जवळच्या नातेवाईकांची स्थिती फार केविलवाणी होते. तुमच्या मनाला एक गोष्ट हवी असते, पण आत्म्याला मात्र काही वेगळंच हवं असतं,” असे मोहित म्हणाला.
तो सांगतो, “मुलांच्या दृष्टीने त्यांचे आई-वडील हे जगातील सर्वात मोठे हिरो असतात; अशा वेळी अचानक त्यांना विभक्त होताना पाहून मुलं गोंधळून जतात. घटस्फोटाच्या वेळीच मुलांना जास्तीत जास्त प्रेम आणि लक्ष देण्याची गरज असते आणि त्यांना हे वास्तव नीटपणे समजावून सांगण्याची गरज असते. मला स्वत:ला घटस्फोट या शब्दाचीच भयंकर भीती वाटते आणि हा प्रसंग कोणावरही येऊ नये, असे मला वाटते.”

मोहित मलिकला सिकंदरच्या भूमिकेत ‘कुल्फीकुमार बाजेवाला’मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 8.30 वाजता फक्त स्टार प्लसवर पाहा. 

Web Title: Mohit Malik feels the fear of the word