मोहम्मद सिराज लोकप्रिय अभिनेत्रीसोबत डेटवर? मुंबईतील कॅफेबाहेरचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 13:31 IST2026-03-30T13:30:27+5:302026-03-30T13:31:29+5:30

मोहम्मद सिराजचं नाव एका अभिनेत्रीबरोबर जोडलं जात आहे. ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे.

Mohammed Siraj Mahira Sharma Spotted Mumbai Cafe Dating Rumors | मोहम्मद सिराज लोकप्रिय अभिनेत्रीसोबत डेटवर? मुंबईतील कॅफेबाहेरचा व्हिडीओ व्हायरल

मोहम्मद सिराज लोकप्रिय अभिनेत्रीसोबत डेटवर? मुंबईतील कॅफेबाहेरचा व्हिडीओ व्हायरल

क्रिकेट आणि सिनेइंडस्ट्रीचे लव्ह कनेक्शन जुने आहे. अनेक खेळाडूंनी अभिनेत्रींशी लग्न केले आहे. विराट-अनुष्का, केएल राहुल-अथिया शेट्टी ही काही लोकप्रिय जोडपी आहेत. क्रिकेट आणि बॉलिवूडमधील डेटिंगच्या चर्चा नेहमीच रंगत असतात. सध्या आता टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचं नाव अभिनेत्री माहिरा शर्मा हिच्यासोबत जोडलं जातं आहे.

नुकतंच मुंबईतील एका कॅफेबाहेर मोहम्मद सिराज आणि माहिरा शर्मा यांना स्पॉट करण्यात आलं आहे. हे दोन्ही स्टार्स मुंबईतील एकाच कॅफेबाहेर दिसून आल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. मोहम्मद सिराज कॅफेच्या बाहेर चाहत्यांशी संवाद साधताना आणि फोटो काढताना दिसला. त्याच वेळी माहिरा शर्मा देखील त्याच कॅफेमधून बाहेर पडली आणि थेट आपल्या गाडीकडे रवाना झाली. जरी ते कॅमेऱ्यासमोर एकत्र आले नसले, तरी त्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळेतील अचूकतेमुळे सोशल मीडियावर डेटिंगच्या चर्चांना हवा मिळाली आहे.


दरम्यान, माहिरा आणि सिराज यांच्यातील मैत्रीची चर्चा २०२४ मध्ये सुरू झाली, जेव्हा त्यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एकमेकांच्या पोस्टवर केलेले लाईक्स आणि कमेंट्स चाहत्यांच्या नजरेतून सुटले नाहीत. तेव्हापासूनच या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याच्या अफवांनी जोर धरला होता. या चर्चांवर माहिरा शर्माने एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिले होते की, "मी सध्या कोणालाही डेट करत नाहीये, मी सिंगल आहे". दुसरीकडे, मोहम्मद सिराजनेही आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजच्या माध्यमातून या बातम्या पूर्णपणे निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावल्या होत्या. मात्र, ताज्या 'कॅफे भेटी'मुळे या चर्चा पुन्हा एकदा हवा मिळाली आहे.


Web Title: Mohammed Siraj Mahira Sharma Spotted Mumbai Cafe Dating Rumors