'ये है मोहोब्बतें'मध्ये मालिकेच्या शेवटच्या दिवशी भावूक झाली दिव्यांका त्रिपाठी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 16:17 IST2017-12-01T09:56:45+5:302017-12-01T16:17:45+5:30

ये है मोहब्बते मालिकेच्या माध्यमातून इशी माँ बनत दिव्यांका त्रिपाठी आता मालिका सोडणरा ही बातमी कळताच रसिकही नाराज झालेत.नुकतेच ...

'This is Mohabbatein' on the last day of the series became emotional Diwali Tripathi! | 'ये है मोहोब्बतें'मध्ये मालिकेच्या शेवटच्या दिवशी भावूक झाली दिव्यांका त्रिपाठी!

'ये है मोहोब्बतें'मध्ये मालिकेच्या शेवटच्या दिवशी भावूक झाली दिव्यांका त्रिपाठी!

है मोहब्बते मालिकेच्या माध्यमातून इशी माँ बनत दिव्यांका त्रिपाठी आता मालिका सोडणरा ही बातमी कळताच रसिकही नाराज झालेत.नुकतेच मालिकेच्या इशी माँ भूमिकेतला शेवटचा ट्रॅक शूट करत असताना दिव्यांका भावूक झाली होती.खरंतर याच मालिकेने दिव्यांकाला अमाप लोकप्रियता मिळून दिली. याच मालिकेपासून  ऑनस्क्रीन आदर्श सूनेचा तिचा प्रवास सुरू झाला होता.त्यामुळेच जेव्हा तिला पुन्हा एकदा तिच्या जुन्या आठवणी आठवतचा गहिवरून आले होते.आपल्या ऑनस्क्रीन व्यक्तिरेखांना अलविदा म्हणणे खूपच कठीण असतं. आता लवकरच ये है मोहोब्बतेंमधील ईशिता आपली मुलगी पिहू हिला वाचवताना मृत्यूमुखी पडताना तुम्ही पाहणार आहात. होय,दिव्यांका त्रिपाठी डिसेंबरमध्ये आपल्या चाहत्यांना आणि मित्रमैत्रीनींना अलविदा करणार आहे.दिव्यांकाची व्यक्तिरेखा भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय व्यक्तिरेखांपैकी एक असून जगभरात तिचे लाखो फॅन आहेत. तिच्या अभिनयाचे तिच्या सौदर्यांचे रसिकांनी भरभरून कौतुक केले. तिच्यावर खूप प्रेम केले. तिच्या वाढदिवशी तर तिला सगळ्यात जास्त मिळणारे गिफ्टस तिच्या फॅन्सनेच गिफ्ट केलेले असतात. पण आता प्रमुख जोडीमधील तिरस्काराकडे ट्रॅक वळला असून एकता कपूर ह्या मालिकेत लवकरच नवीन चेहरे आणणार आहे.त्यामुळे रमणची प्रेयसी ईशिताची व्यक्तिरेखा गुंडांपासून मुलगी पिहू हिला वाचवताना मृत्यूमुखी पडताना दाखवण्यात येणार आहे.याविषयी दिव्यांका सांगते “होय, मी ह्या शोमध्ये रसिकांना दिसणार नाही. इतकेवर्ष रसिकांचे मनोरंजन करताना आता अलविदा म्हणण्याची वेळ आली आहे. रसिकांपासून लांब जाणार याचं वाईट वाटत असून नेहमी माझ्यावर असेच प्रेम करत राहा, तुमचा आशिर्वाद सदैव माझ्यापाठीशी असू द्या हेच रसिकांना सांगेन असे दिव्यांकाने सांगितले.दिव्यांकाच्या एक्झिटमागे वेगळेच कारण असल्याचे समोर येत आहे.यामागे कोणता वाद कारणीभूत आहे असा तुम्ही विचार करत असाल तर तोही चुकीचा आहे.कारण दिव्यांकाच्या एक्झिटमागे एक गोड कारण असल्याचे समोर येत आहे.तिच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे.कारण दिव्यांका लवकरच आई बनणार आहे.ती प्रेग्नंन्ट असल्याची माहिती मिळत आहे.तिच्या 'ये है मोहब्बते' मालिकेतील एक्झिटमागे हेच गोड कारण आहे. 

Also Read:​बुडापेस्टमध्ये दिव्यांका त्रिपाठी शिकली घोडेस्वारी!
 

Web Title: 'This is Mohabbatein' on the last day of the series became emotional Diwali Tripathi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.