Bigg Boss Marathi 3 : दादूस म्हणतोय 'मीच माझ्या मनाचा राजा',वाचा नेमकं काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 15:58 IST2021-10-14T15:44:51+5:302021-10-14T15:58:12+5:30
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आदिश वैद्य आल्यापासून त्याचे काही सदस्यांशी खटके उडत आहेत.

Bigg Boss Marathi 3 : दादूस म्हणतोय 'मीच माझ्या मनाचा राजा',वाचा नेमकं काय घडलं
बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेले “करूया आता कल्ला” या टास्कमुळे आणि स्टार मिळविण्याच्या शर्यतीत बरेच मतभेत, गैरसमज आणि वादविवाद होताना काल दिसून आले. प्रत्येक विद्यार्थी सदस्य प्राध्यापक बनलेल्या सदस्यांना त्यांनी स्टार त्या व्यक्तिला वा त्यांच्या गटातील दुसर्या सदस्याला का द्यावे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण या मध्येच दिलेला शब्द न पाळल्यामुळे सदस्यांमध्ये थोडीशी नाराजी झालेली दिसून येते आहे. संतोष चौधरी (दादूस) सोबत याचविषयावर तृप्ती देसाई आणि विशाल चर्चा करताना आज दिसणार आहेत.
तृप्ती देसाई आणि विशाल दादूसला विचारताना दिसणार आहेत, “आपलं बोलणं झालं होतं ना तृप्तीला नाही विशालला स्टार द्यायचा. तुम्ही शब्द देऊ नका मग.” तृप्ती देसाई म्हणाल्या, “तुम्ही असे शब्द दिले ना, तर उद्या अवघड होईल तुमचं”. त्यावर दादूस यांचं म्हणण आहे, “मी माझ्या डोक्याने खेळतो कोणाच्या सांगण्यावरुन खेळत नाही आणि खेळणार पण नाही. आणि मला काही अवघड होणार नाही, मी कोणाला घाबरत नाही.
मी माझ्या मनाचा राजा आहे”. तृप्ती देसाई म्हणल्या, “तसं नाही बोलत आहे आम्ही. मी सुध्दा इथे पण नाही, तिथे पण नाही. पण निर्णय घेताना मी ठाम असते की कोणाला मत द्यायचं. अशामुळे तुम्हाला आपलं मानणारी मतं पुढे बदलू शकतील.” आता पुढे अजून काय चर्चा होणार ? दादूसना विशाल आणि तृप्ती यांचा मुद्दा कळेल का ? आजच्या भागात पाहायला मिळणार.
इतकंच काय तर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आदिश वैद्य आल्यापासून त्याचे काही सदस्यांशी खटके उडत आहेत. पहिले जयसोबत बाचाबाची झाली मग स्नेहाच्या रागाचा त्याला सामना करावा लागला आणि आता आजच्या भागामध्ये त्याचे आणि सुरेखाचे कडक्याचे भांडण होणार आहे.