‘कृष्णा चली लंडन’मध्ये मेघा चक्रबोर्ती दिसणार हॉट अंदाजात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 07:15 IST2019-04-26T07:15:00+5:302019-04-26T07:15:00+5:30

‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’च्या कथानकाचा काळ आता पाच वर्षांनी पुढे नेण्यात येणार असल्यामुळे मालिकेच्या कथानकाला  कलाटणी मिळणार आहे.

Megha Chakraborty’s look transformation on StarPlus’ Krishna Chali London | ‘कृष्णा चली लंडन’मध्ये मेघा चक्रबोर्ती दिसणार हॉट अंदाजात!

‘कृष्णा चली लंडन’मध्ये मेघा चक्रबोर्ती दिसणार हॉट अंदाजात!

ठळक मुद्दे 'कृष्णा चली लंडन’ ही मालिका चांगलीच गाजते आहे

स्टार प्लस’वरीलकृष्णा चली लंडन’च्या कथानकाचा काळ आता पाच वर्षांनी पुढे नेण्यात येणार असल्यामुळे मालिकेच्या कथानकाला  कलाटणी मिळणार आहे. कृष्णाने आपला भूतकाळ मागे टाकून ‘डॉ. कृष्णा’ म्हणून आपल्या जीवनाला नव्याने प्रारंभ केला असून त्यामुळे तिचा कायापालट प्रेक्षकांना नक्कीच अचंबित करून टाकेल.

अभिनेत्री मेघा चक्रबोर्ती म्हणाली, “नेहमी साडी किंवा ड्रेस अशा पारंपरिक भारतीय वेशात दिसणारी कृष्णा आता एका अगदी नव्या रूपात दिसणार आहे. आता ती शर्ट, जॅकेट, पॅन्ट आणि उंच टाचांच्या चपला घालून पूर्णपणे आधुनिक वेशभूषेत दिसेल. ही नव्या रूपातील कृष्णा अधिक आत्मविश्वासू आणि बंडखोर आहे, असे नव्हे, तर स्वत:चे रुग्णालय चालविणारी ती एक प्रस्थापित डॉक्टर आहे. आजवर सर्व समस्या आणि अडचणींना तोंड देऊन त्यातून बाहेर आलेल्या आणि एक नामांकित डॉक्टर म्हणून आपल्या जीवनाचा नव्याने प्रारंभ करणाऱ्या कृष्णाला नव्या वेशात दाखविणे आवश्यक होते.

कृष्णाच्या जीवनातील या नव्या टप्प्याला साकार करण्यास मी आतुर झाले आहे. प्रेक्षकांना आता कृष्णा एका नव्या रूपात दिसेल. प्रेक्षकांना माझं हे नवं रूप पाहणं पसंत पडेल, अशी मी आशा करते.”

छोट्या पडद्यावर 'कृष्णा चली लंडन’ ही मालिका चांगलीच गाजते आहे. या मालिकेला रसिकांनी चांगलेच डोक्यावर घेतलं आहे. रसिकांची आवडती मालिका म्हणून 'कृष्णा चली लंडन’ या मालिकेने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली आहे.

Web Title: Megha Chakraborty’s look transformation on StarPlus’ Krishna Chali London