मेघा चक्रबर्तीने अशी दिली मैत्रिणीला साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 16:59 IST2018-11-28T16:59:20+5:302018-11-28T16:59:55+5:30

'कृष्णा चली लंडन' मालिकेत मेघाने शुक्ला कुटुंबियांच्या कणखर मनाची सुनेची भूमिका  साकारली असून ऑनस्क्रीन दिसणा-या या सशक्त महिलेची भूमिका नुकतीच वास्तव जीवनातही तिने निभावली असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

Megha Chakraborty comes in support of her friend | मेघा चक्रबर्तीने अशी दिली मैत्रिणीला साथ

मेघा चक्रबर्तीने अशी दिली मैत्रिणीला साथ

 संकटसमयी जो मदतील धावून येतो तोच खरा मित्र असे म्हणतात असेच काहीसे घडले आहे  ‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारी मेघा चक्रबर्तीबरोबर. सोज्वळ सुंदर अभिनयाने मेघाने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली आहे. मालिकेत मेघाने शुक्ला कुटुंबियांच्या कणखर मनाची सुनेची भूमिका  साकारली असून ऑनस्क्रीन दिसणा-या या सशक्त महिलेची भूमिका नुकतीच वास्तव जीवनातही तिने निभावली असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.


होय, तिच्या एका मैत्रीणीला  एका अनोळखी माणूनस त्रास देत असल्याचे  समजताच मेघा तिच्या मदतीसाठी धावली. मेघाला जवळून ओळखणार्‍्या एका सूत्राने सांगितले, “मेघाची एक मैत्रीण आपल्या जीवनातील एका वाईट टप्प्यातून जात होती आणि तिला त्यातून बाहेर पडण्यासाठी किती संघर्ष करावा लगत आहे, याची मेघाला चांगलीच कल्पना होती. तिला या मैत्रिणीबद्दल सहानुभूतीही वाटत होती. तेव्हा तिने या मैत्रिणीला आपला मदतीचा हात दिला आणि तिच्याकडून जी मदत करणं शक्य होती, ती केली. यानंतर मेघा या मैत्रिणीसोबत काही काळ तिच्याकडेच राहात होती, आणि त्यामुळे तिला बराच आधार मिळाला.”


आपल्या मैत्रिणीला तिच्या जीवनातील काही खडतर प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याच्या मेघाची कृती नक्कीच वाखाणण्यासारखी आहे. लवकरच ‘कृष्णा चली लंडन’ या मालिकेतही मेघा शुक्ला कुटुंबातील महिलांची बाजू घेऊन बडे पापांविरोधात उभी रहणार आहे. यावेळी प्रेक्षकांना कृष्णाचे निर्भय आणि आव्हानात्मक रूप पाहायला मिळणार आहे.

Web Title: Megha Chakraborty comes in support of her friend