'तारक मेहता मधील' बापूजी खऱ्या आयुष्यात दिसतात खूप यंग आणि स्मार्ट, पाहा त्यांच्या कुटुंबाचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 20:57 IST2021-09-10T15:35:26+5:302021-09-10T20:57:01+5:30

सोशल मीडियावर अमित भट्टचे खऱ्या आयुष्यातले फोटो पाहायला मिळतात.तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल बापूजी साकारणारे अमित भट्ट जेठालालपेक्षाही वयाने लहान आहेत.

Meet Amit Bhatt Aka Champak Lal Of Taarak Mehta Ka Ooltah Chasmah | 'तारक मेहता मधील' बापूजी खऱ्या आयुष्यात दिसतात खूप यंग आणि स्मार्ट, पाहा त्यांच्या कुटुंबाचे खास फोटो

'तारक मेहता मधील' बापूजी खऱ्या आयुष्यात दिसतात खूप यंग आणि स्मार्ट, पाहा त्यांच्या कुटुंबाचे खास फोटो

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.'तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतले सगळेच कलाकार आज घराघरात प्रसिद्ध आहे. गेल्या १३ वर्षांपासून ही मालिका आणि यातील कलाकार रसिकांचे भरघोस मनोरंजन करत आहेत. जेठालाल, दयाप्रमाणे सगळ्याच भूमिका बच्चेकंपनीपासून ते वयोवद्ध सगळ्यांच्याच चांगल्याच परिचयाच्या आहेत. मालिकेतला कोणता कलाकार जास्त दिवस दिसला नाही तर रसिक लगेचच त्यांची आठवण काढताना दिसतात. 

मालिकेत चंपकलाल जयंतीलाल गडा म्हणेज बापुजी सगळ्यांच्या चांगलेच परिचयाचे आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांनाही प्रचंड रस असतो आज त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.आपल्या अभिनयाने त्यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. चंपकलाला गडा ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे अमित भट्ट. बापूजी ही व्यक्तिरेखा वयस्कर अशी आहे. त्यामुळे अनेकदा अमित भट्ट यांच्या वयावरुन चर्चा रंगते.कारण खऱ्या आयुष्यात दिसायला फारच यंग दिसतो. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन लूक पाहून चाहतेही आश्चर्यव्यक्त करताना दिसतात. 

सोशल मीडियावर अमित भट्टचे खऱ्या आयुष्यातले फोटो पाहायला मिळतात.तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल बापूजी साकारणारे अमित भट्ट जेठालालपेक्षाही वयाने लहान आहेत. त्यांचे खऱ्या  अमित भट्टचे लग्न  कृति भट्टसह झाले आहे. या दोघांच्याही लग्नाला २१ वर्ष पूर्ण झाले आहेत. दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री पाहायला मिळते.  कृतिचे फोटो पाहून तुम्हीही तिच्या सौंदर्यावर फिदा व्हाल इतकी ती सुंदर दिसते.

कृति लाइमलाइटपासून दूरच राहणे पसंत करते. त्यामुळे दोघे फार कमी वेळा एकत्र दिसतात. पण इन्स्टाग्रामवर मात्र कृति प्रचंड सक्रीय असते. अमित आणि कृति या कपलला दोन जुळी मुलं आहेत.देव भट्ट आणि दीप भट्ट असे त्यांच्या मुलांची नावं आहेत. हे दोघेही तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या एका एपिसोडमध्येही झळकले आहेत.मुलगा देव भट्टही सोशल मीडियावर खूप सक्रीय असतो. नेहमीच तो त्याच्या आई-वडिलांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो.

Web Title: Meet Amit Bhatt Aka Champak Lal Of Taarak Mehta Ka Ooltah Chasmah