'ठरलं तर मग' मालिकेला मीरा जगन्नाथचा रामराम, साक्षीच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 17:23 IST2023-08-07T17:22:40+5:302023-08-07T17:23:05+5:30

Mira Jagannath :साक्षीची भूमिका मीरा जगन्नाथने साकारली होती. मात्र काही कारणास्तव मीराने ही मालिका सोडली आहे.

Meera Jagannath left Tharala Tar Mag Serial, this actress will be seen in Sakshi role | 'ठरलं तर मग' मालिकेला मीरा जगन्नाथचा रामराम, साक्षीच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

'ठरलं तर मग' मालिकेला मीरा जगन्नाथचा रामराम, साक्षीच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मगने अल्पावधीतच रसिकांच्या मनात घर केले आहे. ही मालिका गेल्या काही दिवसांपासून टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर आहे. मालिकेतील सायली आणि अर्जुनची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. मालिका सध्या रंजक वळणावर आली असून आता या मालिकेत साक्षीची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री मीरा जगन्नाथ मालिकेतून बाहेर पडली आहे. त्यामुळे आता तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. आता साक्षीच्या भूमिकेत अभिनेत्री केतकी पालव दिसणार आहे.

साक्षीची भूमिका मीरा जगन्नाथने साकारली होती. मात्र काही कारणास्तव मीराने ही मालिका सोडली आहे. त्यामुळे मालिकेत साक्षीच्या भूमिकेत अभिनेत्री केतकी पालव पाहायला मिळणार आहे. केतकी या मालिकेत रुजू झाली असून तिने शूटिंगला सुरुवात केली आहे. मात्र तिने ही मालिका का सोडली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. 

केतकी पालव आहे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री
केतकी पालव मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत मालिकेत निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा दोन्ही भूमिका साकारल्या आहेत. ती स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतही पाहायला मिळाली होती. केतकी पालवला साक्षीच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

ठरलं तर मग मालिका रंजक वळणावर आली आहे. मालिकेत सध्या सायली आणि अर्जुनच्या लग्नाचा घाट टळलेला आहे. मात्र तिकडे तन्वी अर्जुनशी जवळीक साधताना दिसत आहे. त्यामुळे आता या मालिकेत लवकरच एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे.

Web Title: Meera Jagannath left Tharala Tar Mag Serial, this actress will be seen in Sakshi role