Bigg Boss 16 Winner: तरूणाईच्या गळ्यातील ताईत एमसी स्टॅन ठरला ‘बिग बॉस १६’चा विजेता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 10:39 PM2023-02-12T22:39:52+5:302023-02-13T07:45:48+5:30

Bigg Boss 16 Winner: ‘बिग बॉस १६’च्या ग्रँड फिनालेत १२ च्या ठोक्याला विजेत्याच्या नावाची घोषणा झाली आणि सेटवर एकच जल्लोष झाला. तरूणाईच्या गळ्यातील ताईत एमसी स्टॅन बिग बाॅसच्या १६ व्या सीझनचा विजेता ठरला.

MC Stan aka Altaf Shaikh won Bigg Boss Season 16 | Bigg Boss 16 Winner: तरूणाईच्या गळ्यातील ताईत एमसी स्टॅन ठरला ‘बिग बॉस १६’चा विजेता

Bigg Boss 16 Winner: तरूणाईच्या गळ्यातील ताईत एमसी स्टॅन ठरला ‘बिग बॉस १६’चा विजेता

googlenewsNext

Bigg Boss 16 Winner: धमाकेदार ‘बिग बॉस १६’च्या ग्रँड फिनालेत १२ च्या ठोक्याला विजेत्याच्या नावाची घोषणा झाली आणि सेटवर एकच जल्लोष झाला. तरूणाईच्या गळ्यातील ताईत एमसी स्टॅन  बिग बाॅसच्या १६ व्या सीझनचा विजेता ठरला. तर शिव ठाकरे उपविजेता ठरला आहे. प्रियंका चहर चौधरी, शिव ठाकरे, शालीन भनोट, एमसी स्टॅन, अर्चना गौतम अशा पाच फायनलिस्टमध्ये बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली. अखेरच्या क्षणाला शालीन भनोट आणि अर्चना हे दोघं बाद झालेत आणि प्रियंका, शिव व एमसी स्टॅन असे टॉप ३ फिनाले रेसमध्ये उरलेत.

या तिघांमधून ‘बिग बॉस १६’चा विजेता कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना प्रियंकाही बाद झाली आणि शिव व स्टॅन असे टॉप २ स्पर्धक विजेतेपदाच्या शर्यतीत उरले. यापैकी कोण जिंकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना सलमानने स्टॅनच्या नावाची घोषणा केली. एमसी स्टॅनला बिग बॉसची ट्रॉफी सोपवण्यात आली. ‘बिग बॉस 15’ची ट्रॉफी उंचावताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता.

 ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर एमसीने चाहत्यांचे मनापासून आभार मानलेत.सलमानने त्याला बिग बॉस १६ व्या सीझनची ट्रॉफी सोपवली. त्यासोबत ३१ लाख ८० हजार रोख रकमेचा धनादेशही  सुपूर्द केला. 

शिव आणि प्रियंकाने पहिल्या एपिसोडपासूनच फ्रंट फूटवर राहून दमदार खेळ खेळला आहे. या दोघांच्या गेम प्लॅन आणि स्ट्रॅटेजीलाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रियंकाने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ खेळला. ती सगळ्यांना अगदी पुरून उरली. शिवच्या साधेपणानं चाहत्यांची मनं जिंकलीत. शिवचा सच्चेपणा लोकांना भावला. पण एमसी स्टॅनची लोकप्रियता सगळ्यांवर भारी पडली.

Web Title: MC Stan aka Altaf Shaikh won Bigg Boss Season 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.