माझ्या नवऱ्याची बायको फेम अद्वैत दादरकरची पत्नी आहे ही अभिनेत्री, पाहा त्याच्या कुटुंबियांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 07:00 IST2020-04-21T07:00:00+5:302020-04-21T07:00:02+5:30

अद्वैत दादरकरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्याला त्याच्या पत्नीचे आणि मुलीचे अनेक फोटो पाहायला मिळतात.

Mazya Navryachi Bayko saumitra aka adwait dadarkar married to actress Bhakti Desai | माझ्या नवऱ्याची बायको फेम अद्वैत दादरकरची पत्नी आहे ही अभिनेत्री, पाहा त्याच्या कुटुंबियांचे फोटो

माझ्या नवऱ्याची बायको फेम अद्वैत दादरकरची पत्नी आहे ही अभिनेत्री, पाहा त्याच्या कुटुंबियांचे फोटो

ठळक मुद्देअद्वैत दादरकरची पत्नी भक्ती देसाई असून तिच्या तू म्हणशील तसं या नाटकाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेमधील सौमित्रच्या व्यक्तिरेखेमुळे अभिनेता अद्वैत दादरकर महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. या मालिकेत काहीच महिन्यांपूर्वी राधिका आणि सौमित्र यांचे लग्न झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. खऱ्या आयुष्यात देखील सौमित्र म्हणजेच अद्वैत विवाहित असून त्याची पत्नी देखील अभिनयक्षेत्रात असून तिने तिच्या अभिनयगुणांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. अद्वैत आणि त्याच्या पत्नीने फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या मुलीसोबत झी मराठीच्या अळीमिळी गुपचिळी या कार्यक्रमात हजेरी देखील लावली होती.

अद्वैतने मालिकांसोबतच अनेक मराठी नाटकांमध्ये देखील काम केले आहे. त्याची पत्नी देखील त्याच्याप्रमाणेच मराठी रंगभूमीवरील एक प्रसिद्ध कलाकार आहे. अद्वैत दादरकरची पत्नी भक्ती देसाई असून तिच्या तू म्हणशील तसं या नाटकाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या नाटकांचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केले असून या नाटकाची निर्मिती प्रशांत दामले यांनी केली होती. तसेच या नाटकात तिच्यासोबत संकर्षण कऱ्हाडे महत्त्वाच्या भूमिकेत होता. या नाटकातील भक्तीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.

भक्तीने नाटकांप्रमाणेच मालिकेत देखील काम केले आहे. झी मराठीवरील अरुंधती या प्रसिद्ध मालिकेत ती मुख्य भूमिकेत झळकली होती. अद्वैत आणि भक्ती यांना एक मुलगी असून त्या दोघांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला तिचे फोटो पाहायला मिळतात. तिचे नाव मीरा असून ती खूपच गोंडस आहे.

अद्वैत आणि भक्ती दोघे एकमेकांना कॉलेज जीवनापासूनच ओळखतात. कॉलेजमध्ये असताना तो नाटकाचे दिग्दर्शन करायचा तर भक्ती नाटकात काम करायची. त्यामुळेच त्या दोघांचा परिचय झाला. काहीच महिन्यात त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि काही वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Mazya Navryachi Bayko saumitra aka adwait dadarkar married to actress Bhakti Desai