राधिकाने घातलेले दागिन्यांची किंमत आहे लाखोंच्या घरात, आकडा जाणून व्हाल थक्क !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 15:36 IST2019-12-23T15:32:17+5:302019-12-23T15:36:38+5:30

'माझ्या नव-याची बायको' मालिकेमध्ये दिसणाऱ्या विवाह सोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

Mazya Navryachi Bayko Fame Radhika Jewelry Worth Rs. 50 lakh | राधिकाने घातलेले दागिन्यांची किंमत आहे लाखोंच्या घरात, आकडा जाणून व्हाल थक्क !

राधिकाने घातलेले दागिन्यांची किंमत आहे लाखोंच्या घरात, आकडा जाणून व्हाल थक्क !

'गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास ३ वर्षांपूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरक्ष: राज्य करतेय. या मालिकेने ११०० भाग पूर्ण केले आणि आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. छोट्या पडद्यावरील माझ्या नव-याची बायको या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे.  प्रत्येक व्यक्तीरेखेनं रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. 


आता हि मालिका अतिशय विलक्षण वळणावर आली आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत प्रेक्षकांनी नुकतंच पाहिलं की राधिकावरील सर्व आरोप दूर होऊन तिने पुन्हा एकदा कंपनीच्या कारभाराची सूत्र हातात घेतली आहेत. राधिका आणि सौमित्रच्या लग्नाचा मुहूर्त निघाला आहे. २५ डिसेंबर रोजी राधिका आणि सौमित्र विवाहबंधनात अडकणार आहेत. राधिका नवरीच्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडणार असून राधिका अगदी दृष्ट लागेल अशी दिसणार आहे. मालिकेमध्ये दिसणाऱ्या विवाह सोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. 


स्त्री प्रेक्षकांना मालिकांमध्ये दिसणाऱ्या दागिन्यांविषयी विशेष आकर्षण असतं.  राधिकाच्या दागिन्यांची किंमत ऐकून प्रेक्षकांना धक्काच बसेल. लग्नसोहळ्यात राधिकाने घातलेल्या दागिन्यांची किंमत ५० लाख रुपये आहे. हे सर्व दागिने खरे आहेत. बाजूबंद, हार, कानातले, नथ, मांगटिका, तोडे या सर्व दागिन्यांमध्ये नटलेली राधिका खोटी इमिटेशन ज्वेलरी नाही तर वामन हरी पेठे यांच्या ५० लाखांच्या खऱ्या दागिन्यांमध्ये दिसणार आहे. 

 

Web Title: Mazya Navryachi Bayko Fame Radhika Jewelry Worth Rs. 50 lakh