'माझ्या नवऱ्याची बायको' फेम माया उर्फ रुचिरा जाधवने सोशल मीडियावर जाहिरपणे दिली प्रेमाची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 18:36 IST2022-07-18T18:35:49+5:302022-07-18T18:36:16+5:30
Mazya Navryachi Bayko : माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकेत रुचिराने मायाची भूमिका साकारली होती. मायाच्या भूमिकेतून रुचिराला खूप प्रसिद्धी मिळाली होती.

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम माया उर्फ रुचिरा जाधवने सोशल मीडियावर जाहिरपणे दिली प्रेमाची कबुली
कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना त्यांच्या खासगी आयुष्याबाबत अपडेट देताना दिसतात. मग नवीन घर, गाडी खरेदी करणे असो किंवा बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड सोबत प्रेमाची जाहीर कबुली देणे असो. काही दिवसांपूर्वीच सई ताम्हणकर हिने देखील निर्माता अनिश जोगच्या प्रेमात असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर आता माझ्या नवऱ्याची बायको (Mazya Navryachi Bayko) या मालिकेतील माया म्हणजेच अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) हिने देखील प्रियकरासोबतचा फोटो शेअर करून त्याच्या प्रेमात असल्याची कबुली दिली आहे.
रुचिरा जाधवच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. रोहित शिंदे याने तिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने रुचिराच्या प्रेमात असल्याचे म्हटले आहे. रुचिरा आणि रोहित गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. रुचिराच्या बहिणीच्या लग्नात देखील त्याने हजेरी लावली होती. मात्र रुचिराने याबद्दल सांगितले नाही. नुकतेच रुचिराच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोघांनी सोशल मीडियावर खुल्लमखुल्ला प्रेम व्यक्त केले आहे.
रुचिरा ज्याच्या प्रेमात आहे त्या रोहित शिंदेबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. रोहित शिंदे हा पेशाने डॉक्टर आहे. परंतु त्याला मॉडेलिंगची आवड आहे. मिस्टर इंडिया मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल साठी त्याने मॉडेलिंग केले आहे. काही ब्रॅण्डसाठी त्याने रॅम्पवॉक केलं आहे.
कलर्स मराठीवरील तुझ्यावाचून करमेना या मालिकेतून रुचिराने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. बे दुणे दहा, माझे पती सौभाग्यवती, प्रेम हे, फो मो, माझ्या मित्राची गर्लफ्रेंड अशा मालिका वेबसिरीज मधून ती झळकली आहे.
झी मराठीवरीलमाझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकेतून रुचिराने मायाची भूमिका साकारली होती. मायाच्या भूमिकेने रुचिराला खूप प्रसिद्धी मिळाली होती.