माझ्या नवऱ्याची बायको फेम अनिता दातेची अशी आहे लव्हस्टोरी, पाहा तिच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 19:19 IST2019-05-10T19:00:00+5:302019-05-10T19:19:48+5:30

माझ्या नवऱ्याची बायको फेम अनिताचे लग्न चिन्मय केळकरसोबत झाले असून चिन्मय देखील याच क्षेत्राशी संबंधित आहे.

Mazya Navryachi Bayko fame Anita Date love story and husband's picture | माझ्या नवऱ्याची बायको फेम अनिता दातेची अशी आहे लव्हस्टोरी, पाहा तिच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याचा फोटो

माझ्या नवऱ्याची बायको फेम अनिता दातेची अशी आहे लव्हस्टोरी, पाहा तिच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याचा फोटो

ठळक मुद्देएका नाटकाच्या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. सिगारेट्स या नाटकाच्या तालमीच्या वेळी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याची त्यांना जाणीव झाली. पण चिन्मयला लग्न करायचे नव्हते आणि त्याने ही गोष्ट स्पष्टपणे अनिताला सांगितली होती.

अनिता दाते ही सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेतील तिची भूमिका, तिचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. आज अनिता प्रेक्षकांची प्रचंड लाडकी बनली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर तिने हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत काम केले. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती.


 
अनिता ही मुळची नाशिकची असून तिचे बालपण, शिक्षण नाशिकमध्ये झाले आहे. तिचे काका उपेंद्र दाते हे नाट्यक्षेत्रात प्रचंड प्रसिद्ध आहेत. नाशिकच्या कन्या विद्यालयात तिचे शिक्षण झालेले आहे. त्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी पुण्यात गेली. पुण्याच्या ललित कला केंद्रातून तिने पदवी घेतली. अनिताला लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने ती शाळेत आणि कॉलेजमध्ये नाटकांमध्ये काम करत असे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील भूमिकेमुळे तिच्या संपूर्ण करियरला कलाटणी मिळाली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. 

अनिताचे लग्न चिन्मय केळकरसोबत झाले असून चिन्मय देखील याच क्षेत्राशी संबंधित आहे. तो अनेक वर्षांपासून अनुराग कश्यपसोबत काम करत असून तो एक लेखक आहे. ललित केंद्रात असतानाच चिन्मय आणि अनिताची ओळख झाली होती. पण त्यावेळी केवळ ते फ्रेंड्स होते. पण एका नाटकाच्या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. सिगारेट्स या नाटकाच्या तालमीच्या वेळी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याची त्यांना जाणीव झाली.

पण चिन्मयला लग्न करायचे नव्हते आणि त्याने ही गोष्ट स्पष्टपणे अनिताला सांगितली होती. त्यामुळे त्या दोघांनी लिव्ह इन मध्ये राहायला सुरुवात केली. दीड वर्षं ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. त्यानंतर त्या दोघांनी लग्न करायचे ठरवले. आता त्यांच्या लग्नाला अकरा वर्षांहून अधिक काळ झालेला आहे.  

Web Title: Mazya Navryachi Bayko fame Anita Date love story and husband's picture