'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत सीन न वाचताच परी करते अशाप्रकारे शूटिंग !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 17:43 IST2021-12-04T17:41:33+5:302021-12-04T17:43:30+5:30

छोटी परीची भूमिका बालकलाकार मायरा वायकुळने साकारली आहे. तिने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

Mazi Tuzi Reshimgath serial fame Pari aka Myra Vaikul prepares the shoot without reading the scene | 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत सीन न वाचताच परी करते अशाप्रकारे शूटिंग !

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत सीन न वाचताच परी करते अशाप्रकारे शूटिंग !

झी मराठीवर सुरू असलेली माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी झाली आहे. या मालिकेतून बऱ्याच वर्षांनंतर अभिनेता श्रेयस तळपदेने कमबॅक केले आहे. श्रेयस तळपदे या मालिकेमध्ये यशची भूमिका उत्तमरित्या साकारते आहे. तसेच या मालिकेमध्ये त्याच्यासोबत प्रार्थना बेहेरे नेहा कामत ही भूमिका साकारताना दिसते आहे. या मालिकेत दिग्गज कलाकारांची फौज असताना मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय ती म्हणजे छोटी परी. छोटी परीची भूमिका बालकलाकार मायरा वायकुळने साकारली आहे.

मायरा सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती सतत तिचे फोटोज आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी पोस्ट करत असते. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला ज्यात ती अभिनयाची प्रॅक्टीस करताना दिसते आहे. तर याबाबतच अनेकांनी तिला प्रश्न विचारले होते, तर मायरा‌ला ज्या वेळेस शूट करायचे असते, त्यावेळेस ती अनेकांची मदत घेते. 


सुरुवातीला मालिकेचे दिग्दर्शक मायराला तिचा सीन काय आहे, ते समजून सांगतात. त्यानंतर तिला प्रार्थना आणि श्रेयस हे देखील तिचा सीन समजावून सांगण्यास मदत करतात. त्यानंतर ती आपल्याला काय डायलॉग म्हणायचे आहेत, ते आत्मसात करते. त्यानंतर ती अतिशय व्यवस्थितरित्या डायलॉग डिलिव्हरी करते. तिच्या निरागस अभिनयाने तिने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

Web Title: Mazi Tuzi Reshimgath serial fame Pari aka Myra Vaikul prepares the shoot without reading the scene