'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेच्या टायटल साँगवर थिरकले परीचे आई-वडील, पहा त्यांचा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 07:00 IST2021-10-09T07:00:00+5:302021-10-09T07:00:00+5:30

नुकतेच मायराच्या आई वडिलांच्या डान्सच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Mazi Tuzi Reshimgath fames Pari Aka Myara's parents dance on serial title song | 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेच्या टायटल साँगवर थिरकले परीचे आई-वडील, पहा त्यांचा हा व्हिडीओ

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेच्या टायटल साँगवर थिरकले परीचे आई-वडील, पहा त्यांचा हा व्हिडीओ

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत. या दोघांव्यतिरिक्त या मालिकेत संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेतील छोट्या परीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मालिकेत नेहाची मुलगी परीची भूमिका बालकलाकार मायरा वायकुळ हिने साकारली आहे. तिची निरागसता, बोलण्यातील साधेपणा आणि हसणे, रुसणे या सर्व गोष्टींना प्रेक्षकांची दाद मिळताना दिसते आहे. नुकतेच मायराच्या आई वडिलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

खरेतर मालिकेच्या प्रोमोपासूनच मायराला सर्वांची पसंती मिळताना दिसली. मात्र मालिकेत एन्ट्री करण्याआधीपासूनच तिचे असंख्य चाहते आहेत. मायराला टिक टॉक सारख्या प्लॅटफॉर्मवर व्हिडीओच्या माध्यमातून खूप लोकप्रियता मिळाली आहे. ती टिक टॉक स्टार म्हणून ओळखली जाते. इन्स्टाग्रामवरही तिचे खूप फॉलोअर्स आहेत. युट्युबवर मायराज् कॉर्नर आणि वर्ल्ड ऑफ मायरा अँड फॅमिली नावाने मायराचे चॅनेल देखील आहे. नुकतेच मायराच्या आई वडिलांनी माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या टायटल सॉंगवर अप्रतिम डान्स केला. आई बाबांच्या बाजूला मायराने म्हणजेच आपल्या छोट्या परीनेही डान्स केला. या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.


मायरा आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहते. मायराचे वडील गौरव वायकुळ आणि आई श्वेता थोरात वायकुळ हे दोघेही मायराला सतत प्रोत्साहन देत असतात. आपल्या मुलीत काहीतरी खास आहे या उद्देशाने त्यांनी सुरुवातीला तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले आणि काही दिवसातच तिला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. छोट्या मुलीचे हे व्हिडिओ चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. काही दिवसांपूर्वी परीचे खरे आई बाबा गौरव वायकुळ आणि आई श्वेता थोरात यांनी केलेल्या फोटोशूटलाही खूप पसंती मिळाली होती.

Web Title: Mazi Tuzi Reshimgath fames Pari Aka Myara's parents dance on serial title song