परी नेहाचीच लेक असल्याचं सत्य येणार आजोबांसमोर; सून म्हणून करणार का नेहाचा स्वीकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 16:59 IST2022-04-10T16:59:25+5:302022-04-10T16:59:52+5:30
Mazi tuzi reshimgath: परीचं सत्य समजल्यानंतरही ते नेहाचा सून म्हणून स्वीकार करतील का हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

परी नेहाचीच लेक असल्याचं सत्य येणार आजोबांसमोर; सून म्हणून करणार का नेहाचा स्वीकार?
'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सध्या रंजक वळणावर असल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत यश आणि नेहा यांच्या नात्यात अनेक चढउतार आले. त्यातच आता आजोबांच्या आजारपणामुळे नेहाला त्यांच्यापासून परीचं सत्य लपवावं लागत आहे. मात्र, हेच सत्य आता आजोबांसमोर येणार आहे.त्यामुळे सत्य समजल्यानंतरही ते नेहाचा सून म्हणून स्वीकार करतील का हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये आजोबा नेहाला भेटण्यासाठी तिच्या घरी जातात. मात्र, याचवेळी परी, नेहाची लेक असल्याचं सत्य त्यांना समजतं. त्यामुळे या मालिकेत आता आणखी एक नवा ट्विस्ट येणार असल्याचं पाहायला मिळत आहे.
नेहाची आठवण आल्यामुळे आजोबा तिला फोन करतात. यावेळी बोलत असताना नेहाने वांग्याचं भरीत केल्याचं त्यांना कळतं. त्यामुळे हे भरीत खाण्यासाठी ते नेहाचं घर गाठतात. मात्र, त्याचवेळी नेहा, परीला कडेवर घेऊन येते. इतकंच नाही तर नेहाला पाहून बंडू काका, आजोबांसमोरच तिला हाक मारतात.
दरम्यान, आता नेहा आणि आजोबा समोरासमोर आल्यानंतर त्यांना परीचं सत्य समजणार की नाही? किंवा परीचं सत्य समजल्यानंतरही ते नेहाचा सून म्हणून स्वीकार करतील का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या पुढच्या भागातच मिळतील.