'माझा होशील ना'मधील पिंट्या मामाची बायकोही आहे प्रसिद्ध अभिनेत्री, बऱ्याच मालिकांमध्ये केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 07:00 IST2021-08-24T07:00:00+5:302021-08-24T07:00:00+5:30

'माझा होशील ना' मालिकेतील पिंट्या मामाची भूमिकादेखील प्रेक्षकांना खूप भावते आहे.

Maza Hoshil Na Fame Pintya Mama's wife is famous actress, know about her | 'माझा होशील ना'मधील पिंट्या मामाची बायकोही आहे प्रसिद्ध अभिनेत्री, बऱ्याच मालिकांमध्ये केलंय काम

'माझा होशील ना'मधील पिंट्या मामाची बायकोही आहे प्रसिद्ध अभिनेत्री, बऱ्याच मालिकांमध्ये केलंय काम

छोट्या पडद्यावरील मालिका 'माझा होशील ना'ला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत पिंट्या मामाची भूमिकादेखील प्रेक्षकांना खूप भावते आहे. ही भूमिका साकारली आहे अभिनेता निखिल रत्नपारखीने.निखिल रत्नपारखीने अनेक चित्रपट आणि मालिकेत काम केले आहे. निखिल रत्नपारखी यांचे नाव घेतले की आपल्याला विनोदी चेहरा डोळ्यासमोर येतो. त्यांनी आजवर अनेक मालिकेत काम केले आहे. निखिल रत्नपारखीची पत्नीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

निखिल रत्नपारखीच्या पत्नीचे नाव भक्ती रत्नपारखी असे आहे. भक्ती रत्नपारखीदेखील अभिनेत्री आहे. सध्या ती अग्गंबाई सूनबाई मालिकेत मॅडीच्या भूमिकेत पहायला मिळत आहेत.

याशिवाय तिने 'तू अशी जवळी राहा' या मालिकेतही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तसेच भक्ती रत्नपारखीने ओह माय गॉड या हिंदी चित्रपटात काम केले आहे. देऊळ आणि पुणे टीसी या मराठी चित्रपटातही ती झळकली आहे.

तर निखिल रत्नपारखीने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांत विनोदी भूमिका साकारल्या आहेत. निखिलने  ‘ओह माय गॉड’, ‘पहेली’, ‘जयंताभाई की लव्हस्टोरी’ यासारख्या हिंदी चित्रपटांत काम केले आहे.

त्याचप्रमाणे त्यांनी ‘नारबाची वाडी’, ‘व्हेंटिलेटर’, ‘सुपरस्टार’ यासारख्या मराठी चित्रपटात काम केले आहे. त्याच बरोबर त्याने अनेक टीव्ही शो आणि जाहिरातीत सुद्धा काम केले आहे.

Web Title: Maza Hoshil Na Fame Pintya Mama's wife is famous actress, know about her