'मास्टरशेफ इंडियाच्या जजिंग पॅनेलमध्ये झाला बदल; विकास अन् रणवीरसोबत दिसणार 'ही' प्रसिद्ध शेफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 16:25 IST2023-08-25T16:25:40+5:302023-08-25T16:25:54+5:30
MasterChef India: यापूर्वी पूजाने मास्टर शेफ इंडियामध्ये गेस्ट जज म्हणून अनेकदा हजेरी लावली आहे.

'मास्टरशेफ इंडियाच्या जजिंग पॅनेलमध्ये झाला बदल; विकास अन् रणवीरसोबत दिसणार 'ही' प्रसिद्ध शेफ
छोट्या पडद्यावर विशेष गाजत असलेला रिअॅलिटी शो म्हणजे मास्टर शेफ इंडिया. या कार्यक्रमाने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावर या कुकिंग रिअॅलिटी शोची कायम चर्चा असते. लवकरच या कार्यक्रमाचं नवीन पर्व सुरु होत असून या नव्या पर्वात प्रसिद्ध शेफ पूजा धिंग्रा परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
पूजा धिंग्रा हे नाव फूड इंडस्ट्रीमध्ये नवीन नाही. यापूर्वी पूजाने मास्टर शेफ इंडियामध्ये गेस्ट जज म्हणून अनेकदा हजेरी लावली आहे. परंतु, यावेळी ती विकास खन्ना आणि रणवीर ब्रार यांच्यासोबत परिक्षकाची भूमिका बजावणार आहे.
“मास्टरशेफ इंडिया हे होम शेफसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. स्वयंपाकातील दिग्गज शेफ विकास खन्ना आणि शेफ रणवीर ब्रार यांच्यासोबत मास्टरशेफ इंडियाच्या जजिंग पॅनेलमध्ये सामील होताना मला आनंद होत आहे. या कार्यक्रमात जज म्हणून सामील होण्याची आणि शेफ विकास आणि रणवीर यांसारख्या उल्लेखनीय मार्गदर्शकांसोबत मला काम करायची संधी मिळाणं खूप मोठी गोष्ट आहे,” असं पूजा म्हणाली.