शाहरुखचा 'जवान' पाहताना मराठमोळ्या अभिनेत्रीचा थेअटरमध्येच डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 19:30 IST2023-09-15T19:09:59+5:302023-09-15T19:30:18+5:30
जवान चित्रपटात शाहरुख पोलीस आणि सैनिक अशा दुहेरी भूमिकेत आहे. चित्रपटाला चाहत्यांचा उत्तुंग प्रतिसाद मिळत असून थेअटरमध्ये शाहरुखच्या गाण्यावर डान्स करताना चाहते दिसून येतात.

शाहरुखचा 'जवान' पाहताना मराठमोळ्या अभिनेत्रीचा थेअटरमध्येच डान्स
मुंबई - जवान चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुखने देशातील अनेक प्रश्नांना एकत्रितपणे हात घालण्याचा प्रयत्न केलाय. दमदार कथा, उत्तम अभिनय आणि तगडी स्टारकास्ट असलेला शाहरुख खानचा ‘जवान’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शाहरुख मुख्य भूमिकेत असलेला जवान प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुकही होत आहे. केवळ पहिल्या चार दिवसांत सिनेमाने बम्पर कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. तर, चाहत्यांसह सेलिब्रिटीही जवानला दाद देत आहेत. मराठमोळ्या अभिनेत्रीच्या जवान पाहताना थेअटरमध्ये डान्स केल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
जवान चित्रपटात शाहरुख पोलीस आणि सैनिक अशा दुहेरी भूमिकेत आहे. चित्रपटाला चाहत्यांचा उत्तुंग प्रतिसाद मिळत असून थेअटरमध्ये शाहरुखच्या गाण्यावर डान्स करताना चाहते दिसून येतात. शाहरुख खानसाठी २०२३ हे वर्ष खऱ्या अर्थाने खास ठरलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. पठाण चित्रपटातील गाण्यावरही चाहते सिनेमागृहातच तुफानी डान्स करत असल्याचे दिसून आले होते. आता, जवान चित्रपटातील चलिया गाण्यावरही पुन्हा पाय थिरकत आहेत. मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कविने या गाण्यावर डान्स केल्याचं तिने स्वत:च सांगितलंय.
'चलेया' या गाण्यावर हेमांगीने डान्स केला असून हे गाणे ट्रेंडींगमध्ये असल्याचं दिसून येतं. सिनेमा पाहताना हेमांगीला थिएटरमध्येच थिरकण्याचा मोह आवरता आला नाही. म्हणून, मी स्वत:ला रोखू शकले नाही, असे कॅप्शन तिने इन्स्टा स्टोरीमध्ये सिनेमागृहातील तिचा व्हिडिओ शेअर करताना दिले आहे.'मी स्वत:ला रोखू शकले नाही' असे कॅप्शन देत तिने हा डान्सचा व्हिडिओ शेअर केला. शिवाय शाहरुख आणि एटली यांचा हा सिनेमा 'Smashing' असल्याचेही ती म्हणाली. सिनेमात शाहरुखसोबत स्क्रिन शेअर केलेल्या मराठमोळ्या गिरीजा ओकचेही तिने कौतुक केले आहे. गिरीजासाठी हेमांगीने वेगळी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.
पहिल्या ४ दिवसांत २८७ कोटीचीं कमाई
जवानही बॉक्स ऑफिसवर इतिहास रचण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. पहिल्या दिवशी जवानने ७५ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ५३,२३ कोटी, तिसऱ्या दिवशी तब्बल ७७. ८३ कोटींचे कलेक्शन जमवाले होते. आता, रिलीजच्या चौथ्या दिवशी ८१ कोटींचा बिझनेस चित्रपटाने केला आहे. एकूणच पहिल्या चार दिवसांत सिनेमाने २८७. ०६ कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. 'जवान'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन आश्चर्यचकीत करणार आहे. बॉक्सऑफिस ट्रॅकर सचनिकच्या रिपोर्टनुसार ही आकडेवारी देण्यात आली आहे.