Bigg boss marathi 3: सदस्यांना लवकरच मिळणार त्यांचे मोबाईल फोन्स?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 16:39 IST2021-10-04T16:30:34+5:302021-10-04T16:39:08+5:30
Bigg boss marathi 3: या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना आपल्या कुटुंबीयांपासून १०० दिवस दूर रहावं लागतं.

Bigg boss marathi 3: सदस्यांना लवकरच मिळणार त्यांचे मोबाईल फोन्स?
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चिला जाणारा शो म्हणजे बिग बॉस मराठी. यंदा या शोचं तिसरं पर्व सुरु असून घरात दररोज विविध वाद रंगतांना पाहायला मिळतं. विशेष म्हणजे या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना आपल्या कुटुंबीयांपासून १०० दिवस दूर रहावं लागतं. यात स्पर्धकांकडे फोन किंवा अन्य कोणतंही साधन नसल्यामुळे त्यांचा बाहेरील जगापासून पूर्णपणे संपर्क तुटलेला असतो. परंतु, पहिल्यांदाच या घरातील सदस्यांना त्यांचे फोन परत केले जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
बिग बॉसच्या घरात आज एक घोषणा होताना पाहायला मिळणार असून त्यानुसार घरातील सदस्यांना त्यांचे फोन परत मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. “बिग बॉस आपणा सर्वांना आपले फोन्स परत देते आहेत," अशी घोषणा घरात झाली आणि प्रत्येक जण आनंदाने भारावून गेला.सध्या याचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Rryan Khan Arrest updates: ...तर किंग खानच्या मुलाला १० वर्ष खावी लागणार तुरुंगाची हवा?
बिग बॉस मराठीच्या घरात येताना सदस्यांना बर्याच गोष्टींना बाहेरच सोडून याव्या लागतात. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे त्यांचे फोन्स. आणि, आज बिग बॉस तेच फोन सदस्यांना परत करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. स्पर्धकांना त्यांचे फोन्स परत मिळणार की नाही? पुढे काय काय गोंधळ उडणार? हे आजच्या भागामध्ये कळेलच.
आर्यनला सोडवण्यासाठी सतीश मान-शिंदे फ्रन्ट लाइनवर; एका दिवसासाठी घेतायेत इतकी फी
दरम्यान, सध्या बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व चांगलंच रंगलं असून अनेक जण सातत्याने चर्चेत येत आहेत. यामध्येच प्रसिद्ध किर्तनकार शिवलीला पाटील हिने या शोमधून माघार घेतली आहे. काही दिवसांपूर्वी शिवलीलाने प्रकृतीचं कारण देत घरातून बाहेर पडली होती. मात्र, आता या शोमध्ये पुन्हा सहभागी व्हायचं नाही असं तिने स्पष्ट केलं आहे.