Yeu Kashi Tashi Mi Nandayala Updates: ओम-स्वीटूची लव्हस्टोरी होणार पूर्ण; मालिकेत येणार नवा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 14:30 IST2021-11-22T14:30:00+5:302021-11-22T14:30:00+5:30
Yeu Kashi Tashi Mi Nandayala: सध्या 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेचा हा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

Yeu Kashi Tashi Mi Nandayala Updates: ओम-स्वीटूची लव्हस्टोरी होणार पूर्ण; मालिकेत येणार नवा ट्विस्ट
छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या असंख्य मालिकांपैकी एक मालिका म्हणजे येऊ कशी तशी मी नांदायला (Yeu Kashi Tashi Mi Nandayala). उत्तम कथानक आणि कलाकारांची अभिनय शैली यामुळे ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होताना दिसत आहे. गेल्या काही काळापासून ओम आणि स्वीटू यांच्या नात्यात अनेक चढउतार आल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता स्वीटूने कायदेशीररित्या मोहितपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे याच काळात ओम आणि स्वीटू पुन्हा एकत्र येणार असल्याचं पाहायला मिळत आहे.
झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेतील एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये स्वीटू आणि ओम एकमेकांच्या जवळ आल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काळात ही जोडी पुन्हा एक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, सध्या 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेचा हा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. सोबतच ओम आणि स्वीटू या जोडीला पुन्हा एकत्र येण्यासाठी चाहते आतुर झाल्याचं एकंदरीत दिसून येत आहे.