'तुझेच मी गीत गात आहे'मध्ये आणखी एका बालकलाकाराची एन्टी; साकारणार उर्मिलाच्या सावत्र लेकीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 10:32 AM2022-04-24T10:32:47+5:302022-04-24T10:33:39+5:30

Tuzech Mi Geet Gaat Aahe: सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टनुसार, या मालिकेत अन्वीसह आणखी एक बालकलाकार झळकणार आहे.

marathi tv serial Tuzech Mi Geet Gaat Aahe child artist Avanee joshi entry | 'तुझेच मी गीत गात आहे'मध्ये आणखी एका बालकलाकाराची एन्टी; साकारणार उर्मिलाच्या सावत्र लेकीची भूमिका

'तुझेच मी गीत गात आहे'मध्ये आणखी एका बालकलाकाराची एन्टी; साकारणार उर्मिलाच्या सावत्र लेकीची भूमिका

googlenewsNext

छोट्या पडद्यावर दररोज असंख्य नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. यात सध्या 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या नव्या मालिकेची चर्चा आहे. अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे (Urmila Kothare) आणि अभिजीत खांडकेकर यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या मालिकेविषयी अनेक अपडेट चाहत्यांना मालिकेच्या टीमकडून दिले जात आहेत. अलिकडेच या मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला. त्यानंतर आता या मालिकेत आणखी एका बालकलाकाराचा समावेश असल्याचं सांगण्यात येतं.

'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत अभिजीत खांडकेकर एका गायकाची भूमिका साकारणार आहे. तर, उर्मिलाने वैदेही ही भूमिका साकारली आहे. सोबतच बालकलाकार अन्वी तायवडे हिने स्वरा ही भूमिका साकारली आहे. आतापर्यंत या मालिकेच्या प्रदर्शित झालेल्या प्रत्येक प्रोमोमध्ये हे तीनच कलाकार दिसत होते. मात्र, आता या मालिकेतील आणखी एका भूमिकेवरील पडदा दूर झाला आहे. या मालिकेत आणखी एक बालकलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टनुसार, या मालिकेत अन्वीसह आणखी एक बालकलाकार झळकणार आहे. 'मी होणार सुपरस्टार' या रिअॅलिटी शोची सूत्रसंचालक स्वरा जोशी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत एन्ट्री करणार आहे. या मालिकेत ती स्वराच्या सावत्र बहिणीची भूमिका साकारणार आहे.

दरम्यान, या मालिकेत स्वराची एन्ट्री झाल्यामुळे एकंदरीतच या मालिकेत अनेक रंजक भाग पाहायला मिळणार याची खात्री प्रेक्षकांना दिवसेंदिवस होत आहे. तसंच या मालिकेत अभिनेत्री प्रिया मराठेदेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असून तिचा खलनायकी अंदाज या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

Web Title: marathi tv serial Tuzech Mi Geet Gaat Aahe child artist Avanee joshi entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.