अखेर अभ्याला मिळणार दौलतच्या तिजोरीतून कागदपत्र; लवकरच जहागीरदारांना मिळणार त्यांचं घर?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 11:46 AM2022-01-02T11:46:44+5:302022-01-02T11:48:15+5:30

Sundara mana madhe bharli : काही दिवसांपूर्वीच अभ्याने भानुप्रिया हा स्त्रीवेश धारण करुन दौलतच्या घरात प्रवेश मिळवला आहे. सध्या अभ्या भानुशीला म्हणून दौलतच्या घरात कामवाली बाई म्हणून राहत असून सोबतच घराचे कागदपत्रही शोधत आहे.

marathi tv serial sundara mana madhe bharli abhimanyu get the documents | अखेर अभ्याला मिळणार दौलतच्या तिजोरीतून कागदपत्र; लवकरच जहागीरदारांना मिळणार त्यांचं घर?

अखेर अभ्याला मिळणार दौलतच्या तिजोरीतून कागदपत्र; लवकरच जहागीरदारांना मिळणार त्यांचं घर?

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे सुंदरा मनामध्ये भरली. या मालिकेत काही दिवसांपूर्वीच अभिमन्युच्या आईचं निधन झालं. त्यामुळे सध्या जहागीरदारांच्या कुटुंबात अनेक चढउतार येत आहे. एकीकडे आईच्या निधनाचं दु:ख तर दुसरीकडे घराचे कागदपत्र दौलतच्या तावडीत आहेत. त्यामुळे हे कागदपत्र मिळवण्यासाठी अभ्या आणि लतिका प्रयत्न करत आहेत. तसंच जोपर्यंत हे कागदपत्र मिळत नाहीत तोपर्यंत आईंच्या अस्थींचं विसर्जन करणार नाही अशी शप्पथ अभ्याने घेतली आहे. विशेष म्हणजे त्याने या दृष्टीने पावलं टाकण्यासही सुरुवात केली आहे.

काही दिवसांपूर्वीच अभ्याने भानुप्रिया हा स्त्रीवेश धारण करुन दौलतच्या घरात प्रवेश मिळवला आहे. सध्या अभ्या भानुशीला म्हणून दौलतच्या घरात कामवाली बाई म्हणून राहत असून सोबतच घराचे कागदपत्रही शोधत आहे. विशेष म्हणजे आता अभ्याला घराचे कागदपत्र सापडणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये भानुप्रिया म्हणजेच अभ्या दौलतच्या तिजोरीचा पासवर्ड शोधत असल्याचं दिसून येत आहे. परंतु, त्याला काही केल्या पासवर्ड मिळत नाही. अखेर तो लतिकाला फोन करुन पासवर्ड काय असू शकतो असं विचारतो. त्यावर लतिका त्याला दौलतच्या फोन नंबरचे शेवटे चार आकडे टाकायला सांगते. लतिकाच्या सांगण्याप्रमाणे अभ्या हे नंबर पासवर्ड म्हणून टाकतो आणि तिजोरीचं लॉक ओपन होतं. 

दरम्यान, दौलतची तिजोरी उघडल्यानंतर अभ्याला त्याच्या घराचे कागदपत्र मिळतात. परंतु, तो त्या घरातून बाहेर पडत असतांना नेमका दौलतमध्ये येतो. त्यामुळे आता अभ्याचं हे नाटक दौलत समोर उघड होणार का? अभ्याला मिळालेले कागदपत्र तो व्यवस्थित घरी नेऊ शकेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना येत्या भागात मिळणार आहे.

Web Title: marathi tv serial sundara mana madhe bharli abhimanyu get the documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.