सहकुटुंब सहपरिवार: अवनीने पहिल्यांदाच शेअर केला तिच्या ऑनस्क्रीन बाळाचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 19:42 IST2022-01-23T19:40:50+5:302022-01-23T19:42:00+5:30
Sahkutumb sahaparivar: मोरे कुटुंबात हे चिमुकलं बाळ आल्यापासून त्याची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक आतुर झाला आहे.

सहकुटुंब सहपरिवार: अवनीने पहिल्यांदाच शेअर केला तिच्या ऑनस्क्रीन बाळाचा फोटो
छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे सहकुटुंब सहपरिवार. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सुनील बर्वे, किशोरी अंबिये, कोमल कुंभार, नंदिता पाटकर या कलाकारांसोबतच अलिकडेच या मालिकेत एका चिमुकल्या पाहुण्याची एन्ट्री झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच अवनीने एका गोड बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे सध्या मोरे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. अवनीने तिच्या बाळाची सगळी जबाबदारी सरितावर सोपवली आहे. त्यामुळे सरिता दिवसरात्र या बाळाची काळजी घेत असते. परंतु, मोरे कुटुंबात हे चिमुकलं बाळ आल्यापासून त्याची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक आतुर झाला आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांची ही उत्सुकता पाहता नुकताच या बाळाचा फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे.
अवनीची भूमिका साकारणाऱ्या साक्षी गांधी हिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर ऑनस्क्रीन बाळाची पहिली झलक शेअर केली आहे. या फोटोमध्ये तिची लेक तिच्या कुशीत शांतपणे झोपली आहे. सध्या सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत अनेक रंगतदार वळणं येत आहेत. अवनीने बाळाला जन्म दिल्यानंतर आता सरितालाही दिवस जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. अलिकडेच एका भागात तिला बाळाची चाहूल लागल्याचं दाखवण्यात आलं होतं.