गुली मावशीचं नवं कारस्थान;राया-कृष्णाने ठेवलेल्या पुजेच्या शुभप्रसंगी रचणार षडयंत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 17:43 IST2022-04-21T17:43:20+5:302022-04-21T17:43:51+5:30
Man jhal bajind: दादासाहेब बऱ्याच वर्षांनी घरी आल्यामुळे राया आणि कृष्णा घरात सत्यनारायणाची पूजा ठेवतात.

गुली मावशीचं नवं कारस्थान;राया-कृष्णाने ठेवलेल्या पुजेच्या शुभप्रसंगी रचणार षडयंत्र
'मन झालं बाजिंद' ही मालिका सुरु झाल्यावर काही दिवसांमध्येच ती बंद होणार अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांमधून उमटली होती. मात्र, जसजसं या मालिकेचं कथानक पुढे गेलं तसतशी ही मालिका लोकप्रि होऊ लागली. राया आणि कृष्णा यांच्या संसारात येणारी संकटं, त्यावर दोघांनी मिळून केलेली मात हे सगळं नेटकऱ्यांना विशेष भावलं. अनेक संकटांवर मात करुन राया आणि कृष्णा पुन्हा एकत्र नांदू लागले आहेत. मात्र, गुली मावशी पुन्हा एकदा त्यांच्या संसारात फूट पाडण्याचा प्रयत्न करणार आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दादासाहेब बऱ्याच वर्षांनी घरी आल्यामुळे राया आणि कृष्णा घरात सत्यनारायणाची पूजा ठेवतात. या शुभप्रसंगी ते गावातील सर्व गावकऱ्यांना जेवणाचं आमंत्रण देतात. मात्र, या पूजेच्या प्रसंगीही गुली मावशी तिचं षड्यंत्र रचते.
दरम्यान, घरात जेवणासाठी गावकरी आले असताना गुली मावशी या जेवणात काही तरी मिसळण्याचा प्रयत्न करते, जेणेकरुन हे जेवण खाल्ल्याने घालेल्या पाहुण्यांना त्याचा त्रास होईल. मात्र, गुली मावशी, ऋतिक यांनी आखलेला हा प्लॅन सक्सेस होईल का? पुन्हा राया-कृष्णा यांच्यावर बोट उचललं जाईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.