आई कुठे काय करते: असा होणार मालिकेचा शेवट; मिलिंद गवळींनी केला भूमिकेविषयी मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 06:12 PM2023-09-27T18:12:09+5:302023-09-27T18:13:03+5:30

Aai kuthe kay karte: मालिकेच्या शेवटी अनिरुद्धच्या भूमिकेमध्ये होणार मोठा बदल

marathi tv serial aai kuthe kay karte This will be the end of the serial Milind Gawli made a big revelation about the role | आई कुठे काय करते: असा होणार मालिकेचा शेवट; मिलिंद गवळींनी केला भूमिकेविषयी मोठा खुलासा

आई कुठे काय करते: असा होणार मालिकेचा शेवट; मिलिंद गवळींनी केला भूमिकेविषयी मोठा खुलासा

googlenewsNext

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते (aai kuthe kay karte).  आतापर्यंत या मालिकेने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. देशमुख कुटुंबीय आणि अरुंधती यांच्या जीवनात आलेल्या चढउतारांमुळे ही मालिका दिवसेंदिवस रंजक ठरत गेली. विशेष म्हणजे मालिकेचं उत्तम कथानक आणि कलाकारांचा सुंदर अभिनय यामुळे ही मालिका प्रत्येक मराठी प्रेक्षकाची लोकप्रिय ठरली. परंतु, लवकरच ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर या मालिकेचा शेवट कसा होणार हेदेखील अभिनेता मिलिंद गवळी यांनी सांगितलं आहे.

आतापर्यंत या मालिकेचे २०० पेक्षा जास्त भाग झाले आहेत. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना आपलासा वाटतो. परंतु, ही मालिका आता शेवटाकडे वळत चालली आहे. त्यामुळे या मालिकेच्या शेवटीही प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत अरुंधती, कुटुंबीय यांना सतत मानसिकरित्या त्रास देणारा, हेकेखोर अनिरुद्ध मालिकेच्या शेवटी बदलणार आहे. त्याला त्याच्या सगळ्या चुका मान्य होणार आहेत. त्यामुळे या मालिकेचा शेवट गोड होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

अलिकडेच अनिरुद्ध म्हणजेच अभिनेता मिलिंद गवळी यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या भूमिकेविषयी मोठा खुलासा केला. मालिकेच्या शेवटी अनिरुद्धच्या स्वभावात किंवा भूमिकेत कोणता बदल होणार का? असा प्रश्न मिलिंद यांना विचारण्यात आला. त्यावर, हो निश्चित अनिरुद्धच्या स्वभावात बदल होणार आहे. त्याला त्याच्या चुकांची जाणीव आताही होऊ लागली आहे. त्यामुळे तो संधी मिळेल तेव्हा चूक झाल्याचं समजल्यावर ती लगेच माफीही मागतो. अरुंधती, संजना, आप्पा, अगदी मुलांचीही तो माफी मागतो. तो सक्सेसफूल माणूस आहे. मुळात लोकं त्याला रिलेट करतील कारण, कोविडनंतर अचानकपणे मोठमोठे पगार असलेल्यांच्या नोकऱ्या गेल्या, बिझनेस पडले, ज्यांना १४-१५ तास काम करायची सवय आहे ते घरीच बसून आहेत त्या लोकांची अवस्था अनिरुद्धसारखी आहे. पण, या सगळ्यातून ते बाहेर पडले आहेत. त्यामुळे अनिरुद्धचं सुद्धा असंच काहीसं होणार आहे. अनिरुद्ध वाईट माणूस नाही. पण परिस्थितीमुळे त्याला कॉम्प्लेक्स आलाय."

पुढे ते म्हणतात, "नक्कीच मालिकेच्या शेवटी अनिरुद्ध सुधरणार किंवा त्याच्यात पाझिटिव्ह बदल होईल असं वाटतं."  दरम्यान, सध्या आई कुठे काय करते या मालिकेत अनेक रंजक वळण येताना दिसत आहेत. इशाने लग्न केल्यापासून अरुंधतीचा त्रास अजून वाढला आहे. तिच्या बालिश वागण्यामुळे अरुंधतीला सतत त्रास होतोय. त्यामुळे आता या मायलेकींचं नात कोणत्या वळणावर जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: marathi tv serial aai kuthe kay karte This will be the end of the serial Milind Gawli made a big revelation about the role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.