Photos: राणादा-अंजलीचा व्हेकेशन मूड ऑन; सासुरवाडीत सुट्टी एन्जॉय करतीये अक्षया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 02:27 PM2023-04-26T14:27:58+5:302023-04-26T14:28:57+5:30

Akshaya deodhar: सध्या अनेक कलाकार त्यांची उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करत आहेत. यामध्ये अक्षया आणि हार्दिकदेखील त्यांच्या गावी गेले आहेत. लग्नानंतर सुट्टी एन्जॉय करण्यासाठी अक्षयाने तिच्या सासुरवाडीचं गाव निवडलं आहे.

marathi tv couples akshaya deodhar and hardeek joshi vacation mood on | Photos: राणादा-अंजलीचा व्हेकेशन मूड ऑन; सासुरवाडीत सुट्टी एन्जॉय करतीये अक्षया

Photos: राणादा-अंजलीचा व्हेकेशन मूड ऑन; सासुरवाडीत सुट्टी एन्जॉय करतीये अक्षया

googlenewsNext

'तुझ्यात जीव रंगला' असं म्हणत एकमेकांच्या प्रेमात पडलेली लोकप्रिय जोडी म्हणजे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर. या मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच दोघांनी एकत्र स्क्रीन शेअर केली. ऑनस्क्रीन पती-पत्नीची भूमिका साकारणारी ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे नवरा-बायको आहेत. अक्षया सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळेच ती तिच्याविषयीचे प्रत्येक अपडेट चाहत्यांना देत असते. यात अलिकडेच ती तिच्या सासुरवाडीच्या घरी गेली आहे.

सध्या अनेक कलाकार त्यांची उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करत आहेत. यामध्ये अक्षया आणि हार्दिकदेखील त्यांच्या गावी गेले आहेत. लग्नानंतर सुट्टी एन्जॉय करण्यासाठी अक्षयाने तिच्या सासुरवाडीचं गाव निवडलं आहे.  अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिच्या गावचे फोटो शेअर केले आहेत.

दरम्यान, हार्दिकच्या गावाला मोठा समुद्रकिनारा लाभल्याचं या फोटोवरुन लक्षात येतं. अक्षयाने तिच्या घरचे, बीचवरचे आणि हार्दिकसोबतचे फोटो या स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. अलिकडेच अक्षया आणि हार्दिकने मोठ्या धमुधडाक्यात लग्न केलं. या लग्नसोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल झाले होते.
 

Web Title: marathi tv couples akshaya deodhar and hardeek joshi vacation mood on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.