१४३ कि.मी प्रवास करत मुग्धा आणि प्रथमेशने बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांकडून होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 04:13 PM2024-05-08T16:13:44+5:302024-05-08T16:19:40+5:30

सोशल मीडियावर मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी शेअर केलेला मतदानाचा फोटो समोर आला आहे. 

marathi television mugdha vaishampayan and prathmesh laghate traveled pune to alibaugh for lok sabha election 2024 voting | १४३ कि.मी प्रवास करत मुग्धा आणि प्रथमेशने बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांकडून होतंय कौतुक

१४३ कि.मी प्रवास करत मुग्धा आणि प्रथमेशने बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांकडून होतंय कौतुक

Mugdha Vaishampayan And Prathmesh Laghate : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत आहे.  लोकसभेच्या एकूण सात टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी काल मंगळवारी मतदान करण्यात आलं. राज्यातील ११ जागांसह देशातील ११ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील १३ जागांसाठी  मोठ्या उत्साहात नागरिक मतदान करताना दिसून आले. त्याशिवाय मराठी कलाविश्वातही निवडणुकीचा उत्साह पाहायला मिळाला. त्यानिमित्त अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांनी लातूर येथील मतदान केंद्राला भेट देऊन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले. त्यातच सोशल मीडियावर मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी शेअर केलेला मतदानाचा फोटो समोर आला आहे. 

मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे ही जोडी कायमच चर्चेत असलेली पाहायला मिळते. महाराष्ट्रातील लाडक्या कपल्सपैकी ही जोडी सर्वांच्या आवडीची बनली आहे. साधं राहणीमान तसेच उत्तम संस्कारामुळे या जोडप्यावर नेटकरी कौतुकाच वर्षाव करताना दिसतात. मुग्धा आणि प्रथमेश दोघंही कोकणातलेच. मुग्धा अलिबागची तर प्रथमेश रत्नागिरीचा. दरम्यान, लोकसभा निवडणुक २०२४ साठी मतदान करण्याकरिता  मुग्धा आणि प्रथमेशने १४३ किलोमीटरचा प्रवास करत मतदानाचा हक्क बजावला. सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना माहिती दिली. पुणे ते अलिबाग असा जवळपास १४३ कि.मी इतका लांब प्रवास करत त्यांनी मतदान केंद्र गाठलं. तसंच त्यांनी या पोस्टद्वारे  चाहत्यांना मतदान करण्याचं आवाहनही केलं आहे. 

'सा परे ग म प लिटिल चॅम्प' शोच्या पहिल्या पर्वामध्ये प्रशमेश लघाटे आणि मुग्धा वैंशपायन हे दोघं स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही जोडी लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे सध्या हे दोघेही मराठी कलाविश्वात सक्रीय आहेत. 

Web Title: marathi television mugdha vaishampayan and prathmesh laghate traveled pune to alibaugh for lok sabha election 2024 voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.