"आता ती या जगात नाही, पण…", आईबद्दल बोलताना योगिता चव्हाण भावुक, शेअर केल्या आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:22 IST2025-12-31T16:19:58+5:302025-12-31T16:22:01+5:30
आई शिवाय काहीच नाही! योगिता चव्हाणने सांगितली भावुक आठवण, म्हणाली- "आता ती या जगात नाही, पण…"

"आता ती या जगात नाही, पण…", आईबद्दल बोलताना योगिता चव्हाण भावुक, शेअर केल्या आठवणी
Yogita Chavan: अभिनेत्री योगिता चव्हाण या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. वेगवेगळ्या मराठी मालिका आणि रिअॅलिटी शोजच्या माध्यमातून तिने चाहत्यांची मनं जिंकली. 'जीव माझा गुंतला' या मालिकेमुळे ती आजही चाहत्यांमध्ये ओळखली जाते. आता बऱ्याच कालावधीनंतर योगिता छोट्या पडद्यावर परतली आहे. 'तू अनोळखी तरी सोबती' या मालिकेतून ती रसिकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत ती अर्पिता नावाची भूमिका साकारणार आहे. येत्या ५ जानेवारीपासून ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. याचनिमित्ताने योगिताने माध्यमांसोबत संवाद साधताना तिच्या आईबद्दल भावुक प्रतिक्रिया दिली.
अलिकडेच 'तू अनोळखी तरी सोबती' मालिकेचं प्रमोशन पार पडलं. यादरम्यान,मराठी फ्लॅश सोबत संवाद साधताना अभिनेत्रीने भावुक आठवणी शेअर केल्या. यावेळी ती म्हणाली,"माझी आई खूपच चांगली होती,आता ती या जगात नाही. आई जेव्हा होती तेव्हा ती माझ्या आयुष्यातील सपोर्ट सिस्टिम होती. मी जेव्हा आयुष्यात काहीच केलं नव्हतं तेव्हाही तिला वाटायचं की माझी मुलगी म्हणजे किती छान नाचते.मला तिचा खूप पाठिंबा होता. माझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात ती माझ्यासोबत राहिली आहे. मला तिनं तितकं स्वातंत्र्य दिलं, ज्यामुळे मला माझी स्वप्ने पूर्ण करता येतील. शिवाय तितकेच चांगले संस्कारही तिने माझ्यावर केले. पण, मी त्या स्वातंत्र्यांचा मी सुद्धा चुकीचा वापर केला नाही. तिनं अचूक पालकत्व केलं.
त्यानंतर योगिताने सांगितलं, "माझ्या लहापणीच्या आई-वडिलांबाबत कटू आठवणी नाही आहे. माझी त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार सुद्धा नाहीयेत. खूप गोड अशी माझी आई होती. ती जाताना खूप ताकद देऊन गेली."