'तुला पाहते रे' फेम गायत्री दातारची लगीनघाई! लवकरच बोहोल्यावर चढणार, होणारे मिस्टर करतात 'हे' काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 10:11 IST2026-01-06T10:06:40+5:302026-01-06T10:11:19+5:30
सुपारी फुटली! 'तुला पाहते रे' फेम गायत्री दातारच्या घरी लग्नाची लगबग, होणारा नवरा काय करतो?

'तुला पाहते रे' फेम गायत्री दातारची लगीनघाई! लवकरच बोहोल्यावर चढणार, होणारे मिस्टर करतात 'हे' काम
Gayatri Datar: मराठी कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी मंडळींनी लग्नगाठी बांधल्या. तर काहींनी आपल्या नात्याची कबुली देत आपलं नातं जगजाहीर केलं. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचा साखरपुडा पार पडला. तर शिवानी नाईक-अमित रेखी, रुमानी खरे-स्तवन शिंदे तसेच एतिशा सांझगिरी आणि निषाद भोईर ही नवोदित जोडपी विवाहबंधनात अडकतील. आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीची नाव सामील झालं आहे. ही अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार आहे.
'तुला पाहते रे' या मालिकेतून गायत्री दातारने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'अबीर गुलाल' मालिकेत ती दिसली होती. शिवाय 'बिग बॉस मराठी' आणि 'चल भावा सिटीत' या रिएलिटी शोमध्ये गायत्रीने सहभाग घेतला होता. आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री लवकरच बोहोल्यावर चढणार आहे.
दरम्यान, गायत्रीने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावरुन प्रेमाची कबुली दिली होती. पण, तिने तिच्या पार्टनरचा चेहरा दाखवला नव्हता. अखरीस ख्रिसमसं औचित्य साधून माझा आयुष्यातील सांता म्हणत गायत्रीने होणाऱ्या अहोंचा चेहरा रिव्हिल केला. आता अभिनेत्रीच्या घरी तिच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे. नुकतीच गायत्रीच्या लग्नाची सुपारी फुटली असून तिच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी घरी पाहुणे मंडळी जमा झाली आहे. सुपारी फुटली... असं कॅप्शन या व्हिडीओला देत अभिनेत्री ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
गायत्रीचा नवरा काय करतो?
गायत्री दातारच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव श्रीकांत चावरे असं आहे. श्रीकांत एक फोटोग्राफर आहे. आयआयटी बॉम्बेमधून त्याने आपलं शिक्षन पूर्ण केलं आहे. श्रीकांतला फोटोग्राफीशिवाय ट्रॅव्हलिंगची देखील आवड आहे.