पहिल्या नजरेत प्रेम, प्रपोज अन् ६ महिन्यानंतर होकार! 'अशी' जमली अमित-शिवानीची जोडी, लव्हस्टोरी आहे खूपच खास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 17:06 IST2025-11-10T16:49:47+5:302025-11-10T17:06:54+5:30
एकतर्फी प्रेम, ८ वर्षांचं रिलेशनशिप अन्...; अमित-शिवानीची लव्हस्टोरी आहे खूपच खास

पहिल्या नजरेत प्रेम, प्रपोज अन् ६ महिन्यानंतर होकार! 'अशी' जमली अमित-शिवानीची जोडी, लव्हस्टोरी आहे खूपच खास
Shivani Naik And Amit Rekhi: अभिनेत्री शिवानी नाईक आणि अभिनेता अमित रेखी ही जोडी सध्या मराठी कलाविश्वात चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे अलिकडेच शिवानी आणि अमितने साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. नुकतेच त्यांनी त्यांच्या प्रेमकहाणीचे खास किस्से शेअर केलेत. ज्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आहे.
अमित आणि शिवानीने जवळपास ८ वर्षांच्या रिलेशनशिप लग्नाचा निर्णय घेतला. पहिल्यांदा एकांकिकेच्या सेटवर भेट आणि त्यानंतर मैत्री अशी सुरु झालेली ही लव्हस्टोरी यशस्वी झाली आहे. नुकत्याच मनोरंजनविश्वला दिलेल्या मुलाखतीत त्यांची प्रेमकहाणीला कशी सुरुवात झाली याबद्दल सांगितलं. तो किस्सा शेअर करताना शिवानी म्हणाली, आम्ही एका एकांकिका स्पर्धांमध्ये एकमेकांना भेटलो होतो. आम्ही दोघेजन एकमेकांचे प्रतीस्पर्धी होतो. त्यादरम्यान अमितने मला काम करताना पाहिलं होतं. त्यानंतर ६ महिने मी त्याचं काम बघत होते पण त्याच्याविषयी काहीच माहित नव्हतं. पण, मी त्यांच्या एकांकिकेच्या प्रचंड प्रेमात होते. माझ्यासाठी माझं काम, एकांकिका स्पर्धा हेच सगळं होतं. मला फक्त तेव्हा त्याचा मेसेज आलेला की, तू मला आवडतेस वगैरे...".
यानंतर अमित म्हणाला, "मला सगळ्यात आधी ती अभिनेत्री म्हणून आवडली. नंतर मग मी तिच्या माणूस म्हणून प्रेमात पडलो. स्टेजवर मी जेव्हा तिला काम करताना पाहिलं तेव्हा कमाल अभिनय आणि ती एकांकिका खूप कमाल होतो. मी चार-पाच महिने फक्त तिला पाहत होतो. तिची संपूर्ण टीम मला ओळखायची पण तिच्याशी मी कधीच बोललो नाही. कारण, मला कायम भीती वाटायची."
६ महिन्यानंतर होकार दिला अन्...
"शिवानीचा प्रत्येक प्रयोग मी थिएटरमध्ये बसून पाहिला आहे. पण मी तिला फेसबूक,इन्स्टाग्रामवर खूप शोधलं आणि ती मला दिसली. मग मी तिला मेसेज केला नंतर सगळं मनातलं सांगितलं. त्यानंतर सहा महिने वेळ घेऊन तिने हा मुलगा कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे. असा विचार करून तिने मला होकार दिला." असा सुंदर किस्सा अमितने शेअर केला.