"देवाने फारच विशेष चॉईस करून पाठवलेल्या...", अभिनेत्री अमृता बनेची सासरेबुवांच्या वाढदिवशी खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 10:25 IST2024-12-23T10:23:48+5:302024-12-23T10:25:45+5:30
अमृता बने (Amruta Bane) ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

"देवाने फारच विशेष चॉईस करून पाठवलेल्या...", अभिनेत्री अमृता बनेची सासरेबुवांच्या वाढदिवशी खास पोस्ट
Amruta Bane: अमृता बने (Amruta Bane) ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'कन्यादान','सातव्या मुलीची सातवी मुलगी', 'रंग माझा वेगळा' आणि 'वैजू नंबर-१' यांसारख्या मालिकांमध्ये काम करून तिने छोटा पडदा गाजवला. सध्या अमृता स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मिहिका नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. अमृता ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. त्याद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकतीच अमृताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने आपल्या सासरेबुवांना वाढदिवसानिमित्त खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
अमृताने तिच्या इन्स्टाग्रावर अकाउंटवर सासऱ्यांच्या वाढदिवशी एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने तिचे सासरे वासुदेव एकबोटे यांच्यासाठी शेअर केलेल्या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. त्या पोस्टमध्ये तिने लिहिलंय की, "आपण जन्माला आल्यावर कोणती माणसं आपल्या आयुष्यात येणार याचा चॉईस आपल्याकडे नसतो. त्यामुळे माझ्या प्रारब्धात असलेली आणि देवाने फारच विशेष चॉईस करून पाठवलेल्या खास व्यक्तींमधली ही माझ्या आयुष्यातली खास व्यक्ती म्हणजे माझे सासरे वासुदेव एकबोटे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!"
पुढे तिने लिहिलंय, "आज जेव्हा मला सगळे म्हणतात की छान, मनमोकळे आणि 'कूल' आहेत तुझे सासरे तेव्हा एक पैसा भारी नक्कीच वाटतं. पण त्यासोबत त्यांचं असं असण्यामागे देवाने चॉईस करून पाठवलेली माणसं यांना आपल्या आयुष्यात धरून आणि टिकवून ठेवण्यासाठी ते जे मानसिक, शारीरिक आणि वैचारिक कष्ट घेतात याचा खरच खूप हेवा वाटतो. असा सहज आणि सोपेपणा मला आणि शुभंकरला वारसा म्हणून मिळाला आहे, त्यासाठी थँक यू. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा."
अमृताने यंदा एप्रिल महिन्यात अभिनेता शुभंकर एकबोटेसोबत लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरूवात केली. शुभंकर हा दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा असून अश्विनी यांनीही अनेक मालिकांमध्ये काम करत स्वतःची ओळख बनवली होती. 'कन्यादान' या मालिकेत अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांनी काम केलं होतं. मालिकेच्या सेटवर अमृता आणि शुभंकरची ओळख झाली होती. तर मालिकेतही त्यांनी एकत्र स्क्रीन शेअर केलं होती. त्यांनी साकारलेली वृंदा आणि राणा ही भूमिका खूप गाजली. या मालिकेदरम्यान त्यांची मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. पुढे जाऊन त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.