'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून अभिनेत्रीची अचानक एक्झिट! आता 'ही' अभिनेत्री साकारणार स्वाती कोळीची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 11:19 IST2025-05-20T11:16:59+5:302025-05-20T11:19:35+5:30
'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवीन एन्ट्री; आता स्वाती कोळीच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री, म्हणाली...

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून अभिनेत्रीची अचानक एक्झिट! आता 'ही' अभिनेत्री साकारणार स्वाती कोळीची भूमिका
Premachi Gosht: छोट्या पडद्यावरील मालिका या घराघरात पाहिल्या जातात. या मालिकांमध्ये अनेकदा कथानकानुसार नवनवीन बदल होताना दिसतात. कधी जुन्या कलाकारांची मालिकेतून एक्झिट होते तर त्याजागी नवीन कलाकारांची एन्ट्री होते. अलिकडेच स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रेमाची गोष्ट या मालिकेतून अभिनेत्रीने स्वातीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोमल सोमारे गजमलने एक्झिट घेतली. तेजश्री प्रधान पाठोपाठ काही महिन्यांनंतरच कोमलने घेतलेली एक्झिट अनेकांना धक्का देणारी ठरली. त्यात आता या मालिकेसंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या मालिकेत आता एका लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.
'प्रेमाची गोष्ट' या मालिकेचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सध्या मालिकेत सागर-मुक्ताचा मुलगा आदित्यच्या जीवाशी खेळणाऱ्या हर्षवर्धनचा धडा शिकवणार असल्याचा सीक्वेंस सुरु आहे. असं रंजक कथानक सुरु असताना अभिनेत्री कोमल सोमारे गजमलने अचानक बाहेर पडली. आता तिच्या जागी अभिनेत्री नम्रता सुमिराजची एन्ट्री झाली आहे. यापुढे नम्रता सागर कोळीची बहिण म्हणजेच स्वातीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आता अभिनेत्री नम्रता सुमिराजची कोळी कुटुंबाची महत्वाची सदस्य म्हणून मालिकेत एन्ट्री घेणार आहे. सोशल मीडियावर याबाबत खास पोस्ट शेअर करत नम्रताने तिच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. "प्रेम आणि कृतज्ञतेने स्वातीची भूमिका पुढे नेत आहे..., मला प्रेक्षकांकडून असंच प्रेम मिळेल अशी आशा आहे." अशी पोस्ट तिने लिहिली आहे.
दरम्यान, अभिनेत्री नम्रता सुमिराजच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने यापूर्वी मन धागा जोडते नवा या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकली. या मालिकेत तिने साकारलेले शकूचे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं.