"दोघंही त्या मार्गावर असू जिथे...", अपूर्वा नेमळेकर दुसऱ्यांदा थाटणार संसार, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 12:30 IST2025-09-30T12:25:43+5:302025-09-30T12:30:22+5:30
अपूर्वा नेमळेकरच्या आयुष्यात पुन्हा प्रेम येणार का? दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली-"योग्य जोडीदार..."

"दोघंही त्या मार्गावर असू जिथे...", अपूर्वा नेमळेकर दुसऱ्यांदा थाटणार संसार, म्हणाली...
Apurva Nemlekar: अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.'आभास हा',' आराधना',' रात्रीस खेळ चाले' आणि ' प्रेमाची गोष्ट' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम करुन तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 'रात्रीस खेळ चाले' मालिकेत शेवंता नावाच्या पात्रामुळे ती आजही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. अशातच ही अभिनेत्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अपूर्वाने एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
नुकतीच नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अपूर्वा नेमळेकरने 'लोकशाही फ्रेंडली' ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीला ती लग्नासाठी सेकंड चान्स देणार का? याबद्दल विचारण्यात आलं. त्या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, "मला आयुष्याला दुसरी संधी नक्कीच द्यायची आहे. काही गोष्टी अपूर्ण राहिल्या असतील पण, मला असं वाटतं कोणाबरोबर तुम्ही तुमचं आयुष्य घालवता हे देखील महत्त्वाचं आहे."
दुसऱ्या संधीबद्दल अपूर्वा नेमळेकर काय म्हणाली?
यापुढे अभिनेत्री म्हणाली," दुसऱ्या संधीबद्दल बोलायचं झालं तर मला वाटतं की योग्य जोडीदार असणं खूप गरजेचं आहे. जिथे प्रेम असावं कोणत्याही मर्यादा नसाव्यात, मैत्री आणि एकमेकांबद्दल आदर असावा. त्या व्यक्तीने फक्त पार्टनर म्हणून न राहता, जो मला मोठं करतोय मी त्याला मोठं करतेय असं नातं असावं. शिवाय दोघंही त्या मार्गावर असू जिथे तिसऱ्या कोणाचीही गरज नाही आणि जग खूप सुंदर आहे असं वाटेल, अशा पार्टनरसोबत मला सेकंड चान्स घ्यावा असं वाटेल." असा खुलासा अभिनेत्रीने मुलाखतीमध्ये केला.
दरम्यान, करिअरच्या शिखरावर असताना अपूर्वाचं लग्न झालं होतं. मात्र काही कारणांमुळे तिचा घटस्फोट झाला. अपूर्वाचं आधी लग्न झालेलं आहे. २०१४ मध्ये तिने रोहन देशपांडेसोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.मात्र,आता अपूर्वाने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.